Wednesday, April 8, 2020

असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजन

चिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. या दृष्टीने चिकू बागेत एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करावे. वेळेवर कीड,रोग नियंत्रणासाठी उपाय योजना करावी. 

बागेत जमिनीवर पडलेली रोगट फळे तसेच सडलेली व किडलेली फळे वेचून शेताच्या बाहेर जाळून नष्ट करावीत. पावसाळ्यानंतर जमिनीची वरचेवर हलकी उखळणी करावी.

पाण्याचा निचरा

  • बागेत जमिनीतील पाण्याचा निचरा होऊन मुळ्यांना हवा मिळणे आवश्यक आहे. याकरिता झाडांच्या दोन ओळी मध्ये जमिनीच्या उतारानुसार चर काढावा. झाडाच्या खोडाजवळ मातीची भर द्यावी. 
  • निचरा झालेले पाणी शेताच्या बाहेर जाईल अशी व्यवस्था करावी

बागेचे पुनरुज्जीवन आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणी

  • २५ ते ३० वर्षापूर्वीच्या जुन्या बागांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. जुन्या, अनुत्पादित फांद्या काढून टाकाव्यात.
  • जमिनीपासून ३० फूट उंचावर मध्य शेंडा कापून टाकावा. सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचेल याप्रमाणे तज्ञांच्या मार्गदर्शनाने छाटणी करावी.

हिरवळीच्या खतांचा वापर

  • दोन झाडांच्या मधल्या जागेत उडीद, मूग, ताग, धैंच्या यांपैकी एका हिरवळीच्या पिकाची लागवड करून ते जमिनीत गाडावे अथवा या पिकाच्या खोडाजवळ आच्छादन करावे.\

कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत, पेंडीचा वापर

  • चांगले कुजलेले शेणखत ट्रायकोडर्माचा वापर करून झाडाच्या आळ्यामध्ये  ५० ते १०० किलो प्रती झाड या प्रमाणात मिसळावे.
  • सोबत निंबोळी पेंड, मोहाची पेंड किंवा एरंडी पेंड यांपैकी एक ५ किलो प्रती झाड शेणखतासोबत द्यावे. ही खते वर्षातून दोन वेळा अर्धी अर्धी मात्रा करून द्यावीत.

माती व पाणी परीक्षण

  • बागेतील  माती व पाणी परीक्षण करून घ्यावे.
  • जमिनीचा सामू व अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खतांचे योग्य नियोजन करावे.

रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

  • प्रती झाड १००० ग्रॅम नत्र : ५००  ग्रॅम स्फुरद : ५०० ग्रॅम पालाश या प्रमाणात मुख्य खते वर्षातून तीन वेळा जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी महिन्यात २५, २५ व ५० टक्के विभागून द्यावीत. 
  • यासोबत माती परीक्षण करून गरजे प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये वरील खतासोबत मिश्रण करून द्यावीत.

भात पेंढ्याचे आच्छादन

  • भाताच्या पेंढ्यामध्ये सिलिकॉन हा घटक असतो. खोडाभोवती आळ्यामध्ये भात पेंढा पसरवून त्यावर माती टाकावी म्हणजे पेंढा लवकर कुजून त्याचे खत झाडाला मिळते.
  • आळ्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिकरित्या गांडूळे तयार होतात. ही गांडूळे जमीन भुसभुशीत करून मुळांना हवा मिळवून देतात तसेच गांडूळखत उपलब्ध करून देण्याचे काम करतात.

जिवाणू खताचा वापर

  • पी.एस.बी. जिवाणू २ लिटर प्रती एकर या प्रमाणात २०० किलो कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतामध्ये आठ दिवस ओले करून सावलीत ठेवावे. 
  • प्रती झाड ५ किलो जिवाणू संवर्धित कंपोस्ट खत झाडाच्या आळ्यात मिसळावे.

ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास फ्लूरॉन्सिसचा वापर

  • ट्रायकोडर्मा २ किलो व सुडोमोनास १ किलो प्रती एकर या प्रमाणात वरील प्रमाणे २०० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खतात आठ दिवस वेगवेगळे ओले करून ठेवावे.
  • प्रती झाड ५ किलो ट्रायकोडर्मा व स्युडोमोनास संवर्धित खत जमीन ओली असताना सर्वत्र बागेत जमिनीवर मिसळावे. हे वर्षातून  तीन वेळा करावे. जूनचा पहिला आठवडा, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात म्हणजे जमिनीतील सुप्तावस्थेतील रोगकारक बुरशीचा नाश होईल.

बागेचे व्यवस्थापन

  • बोर्डो मिश्रण १ टक्के या प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी जून व दुसरी फवारणी जुलै महिन्यात करावी.
  • तिसऱ्या  फवारणीकरिता मेटॅलॅक्झिल व मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक किंवा फोसेटील ए एल २ ग्रॅम प्रती लिटर पाणी यांपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी खोड, फांद्या व संपूर्ण झाडावर करावी. 
  • फवारणी मध्ये १ मिली प्रती लिटर स्टिकरचा वापर करावा.
  •  प्रकाश सापळ्याचा वापर 
  • चिकू बी खाणारी अळी , कळी  पोखरणारी अळी  व इतर निशाचर वर्गातील किडींच्या व्यवस्थापनासाठी एकरी एक प्रकाश सापळा शेतात लावावा. 
  • संध्याकाळी  ७ ते ९.३० या वेळेतच सापळ्यातील दिवा चालू ठेवावा.

बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

  •  प्रोफेनोफॉस १.५ मिली किंवा इंडोक्झाकार्ब ०.५ मिली किंवा नोव्हाल्युरॉन ०.५ मिली किंवा डेल्टामेथ्रिन १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून तीन फवारण्या ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कराव्यात.

टीप- वरील सर्व कीटकनाशकांसाठी अॅग्रेस्को शिफारशी आहेत.

संपर्क - प्रा. उत्तम सहाणे, ७०२८९००२८९
(पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र,  कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. पालघर)

News Item ID: 
820-news_story-1586349413-246
Mobile Device Headline: 
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजन
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi planning of Good quality sapota production
Author Type: 
External Author
प्रा. उत्तम सहाणे  
Search Functional Tags: 
खत, Fertiliser, वन, forest, उडीद, मूग, ताग, Jute, कीटकनाशक, पालघर, Palghar
Twitter Publish: 
Meta Keyword: 
planning, quality, sapota, production, orchards, fruits,
Meta Description: 
planning of Good quality sapota production चिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व गुणवत्ता वाढण्याची गरज आहे. या दृष्टीने चिकू बागेत एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करावे. वेळेवर कीड,रोग नियंत्रणासाठी उपाय योजना करावी. 

0 comments:

Post a Comment