Thursday, April 2, 2020

पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव मिळावा, ग्राहकांना सुरळीत रास्त दरात भाजीपाल्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पुणे बाजार समितीमध्ये सोशल डिस्टनिंगची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. गुरुवारी (ता.२) मुख्य आवारासह मांजरी उपबाजारात ५४२ वाहनांमधून सुमारे १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. 

बाजार समितीमधील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा, बटाटा आणि भाजीपाला बाजार दिवसाआड सुरु असतो. तर, रोज शेतमालाच्या केवळ ४०० वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. तर, खरेदीदारांच्या वाहनांना काही वेळांच्या अंतराने प्रवेश दिला जात असल्याने गर्दी नियंत्रणात राहत आहे. 

गुरुवारी मुख्य आवारात भाजीपाल्याची ४१० वाहनांमधून ८ हजार ३००, तर मांजरी उपबाजारात १३२ वाहनांमधून १ हजार ६०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. आवक आणि मागणी संतुलित असल्याने बाजार सुरळीत सुरू आहे. दर देखील नियंत्रणात आले आहेत, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 
 
News Item ID: 
820-news_story-1585817922-924
Mobile Device Headline: 
पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव मिळावा, ग्राहकांना सुरळीत रास्त दरात भाजीपाल्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पुणे बाजार समितीमध्ये सोशल डिस्टनिंगची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. गुरुवारी (ता.२) मुख्य आवारासह मांजरी उपबाजारात ५४२ वाहनांमधून सुमारे १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. 

बाजार समितीमधील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा, बटाटा आणि भाजीपाला बाजार दिवसाआड सुरु असतो. तर, रोज शेतमालाच्या केवळ ४०० वाहनांनाच प्रवेश देण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. तर, खरेदीदारांच्या वाहनांना काही वेळांच्या अंतराने प्रवेश दिला जात असल्याने गर्दी नियंत्रणात राहत आहे. 

गुरुवारी मुख्य आवारात भाजीपाल्याची ४१० वाहनांमधून ८ हजार ३००, तर मांजरी उपबाजारात १३२ वाहनांमधून १ हजार ६०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. आवक आणि मागणी संतुलित असल्याने बाजार सुरळीत सुरू आहे. दर देखील नियंत्रणात आले आहेत, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 
 
English Headline: 
Agriculture news in marathi Incoming of 10 thousand quintal vegetable in Pune Market Committee
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, बाजार समिती, agriculture Market Committee, भाजीपाला बाजार, Vegetable Market, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Incoming, 10, thousand, quintal, vegetable, Pune, Market, Committee
Meta Description: 
Incoming of 10 thousand quintal vegetable in Pune Market Committee पुणे : गुरुवारी (ता.२) मुख्य आवारासह मांजरी उपबाजारात ५४२ वाहनांमधून सुमारे १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. 

0 comments:

Post a Comment