नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या प्रसारामुळे सध्या जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोरोनामुळे पुरवठा आणि मागणीला सर्वाधिक फटका बसला आहे. वर्ष २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. मात्र २०२० कोरोनामुळे बहुतांश देशांनी लॉकडाउन केल्याने आर्थिक घडामोडींवर मर्यादा आल्या आहेत, असे केपीएमजीने प्रसिद्ध केलेल्या 'पोटेंशिअल इम्पॅक्ट ऑफ कोविड १९ ऑन द इंडियन इकॉनॉमी' या अहवालात म्हटले आहे.
जागतिक पातळीवर उत्पादन थांबले असून बऱ्याच कंपन्यांना कच्चा माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. चीनमध्ये उत्पादन थांबल्याने त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. बहुतांश देशांचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५० च्या खाली पोचला आहे. जे जागतिक पातळीवर मंदीचे येण्याची शक्यता दर्शविते आहे. चीनमध्ये फेब्रुवारी महिन्यात पीएमआय ४०.३ होता. चीनमधील वुहान शहर हे चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. शिवाय जगातील पुरवठा साखळीतील (ग्लोबल सप्लाय चेन) महत्त्वाचे केंद्र आहे. जगातील बहुतांश कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठा वुहानमधून होतो.
सेवा क्षेत्रालाही फटका
कोरोनामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या सामुग्रीचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे आधीपासून अडचणीत असलेले मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आणखी अडचणीत आहे. आता कोरोनामुळे सेवा क्षेत्र देखील मंदीच्या चक्रात आले आहे. १८ मार्चपर्यंत जागतिक 'रेस्टॉरंट डिनर'मध्ये ८९ टक्क्यांची घसरण झाली होती. आता पुढील काही आठवडे ती १०० टक्क्यांवर पोचण्याची शक्यता आहे. बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार, १४ मार्चच्या आठवड्यात अमेरिकी 'अनएम्प्लॉयमेन्ट क्लेम'मध्ये ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
डॉलरचे वाढते बळ
जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सुरक्षित 'ॲसेट' म्हणून डॉलर, येन आणि युरोकडे वळाले आहेत. परिणामी इतर देशांच्या चलनाचे अवमूल्यन झाले आहे. २० जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ३.८ टक्के अवमूल्यन झाले आहे. तर मेक्सिकन चलनाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचे १४.९ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. चलनाच्या अवमूल्यनामुळे विकसनशील देशांच्या चिंतेत भर पडली आहे.
लॉकडाउन वाढल्यास विकासदरावर परिणाम
भारताने जरी कोविड १९ चा प्रसार रोखण्यास यश मिळविले तरी भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांशी जोडलेली असल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेत देखील सुधारणा होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास भारताचा विकासदर ४ ते ४.५ टक्के राहील. मात्र जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढल्यास भारताचा विकासदर ३ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम
भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) वर्ष २०१९-२० च्या तिसऱ्या तिमाहीत सहा वर्षातील नीचांकी पातळीवर पोचला आहे. कोविड-१९ मुळे आता नवीन समस्या उभी राहिली आहे. देशात २१ दिवसांच्या पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी मंदावल्यामुळे उपभोग आणि गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे भारतीय उद्योगांवर परिणाम झाला आहे. भारताच्या जीडीपीवर मुख्यतः खासगी उपभोग, गुंतवणूक आणि बाह्य व्यापार या तीन घटकांचा मोठा प्रभाव आहे.

0 comments:
Post a Comment