Thursday, April 9, 2020

राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून

नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ७८ ते ८० लाख क्विंटल कापसाचा घरात साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. येत्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशांची सोय कशी करावी, तसेच कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

सीसीआय तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून यंदा ५५५० रुपये क्विंटल या हमीभावाने कापूस खरेदी झाली. खुल्या बाजारात मात्र ४७०० ते ४९०० रुपये क्विंटल दर मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’कडे कापूस विक्री करण्यावर भर दिला. यावर्षी पणन महासंघाने विक्रमी ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटल कापूस खरेदी केला. मात्र, सुमारे ७८ ते ८० लाख क्‍विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचा दावा केला जात आहे.  त्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यापुढील काळात मागणी वाढून हमीभावापेक्षा दर वधारतील, अपेक्षा कापूस उत्पादकांना होती. मात्र ‘कोरोना’मुळे कापूस बाजार ठप्प झाल्याने त्यांची स्थिती अडकित्त्यात सापडल्यागत झाली आहे. 

शासनाने खरेदीचा विचार करावा
शिरुळ (ता.हिंगणा जि. नागपूर) हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. बहुतांश क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. दरवाढीच्या शक्‍यतेने कापूस साठवून ठेवला. आता मात्र आमच्यावर रडण्याची वेळ आली आहे, अशी माहिती शेतकरी विनोद येळणे यांनी दिली. कापूस वेचणीसाठी १५० रुपये मण (२० किलो) प्रमाणे मजुरी होती. येत्या हंगामाकरिता पैसे कसे उभारावे ही अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. पैसे मिळण्याबाबत भरवसा नसल्याने मशागतीकरिता ट्रॅक्‍टरचालकही येण्यास तयार नाहीत, असे विनोद येळणे यांनी सांगितले. 

राज्यात पणन महासंघाने ५२ लाख क्‍विंटल तर सीसीआयने ७२ लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केला आहे. दरवाढीच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांनी कापूस ठेवला. राज्यात सुमारे ८० लाख क्‍विंटलपेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. ‘कोरोना’मुळे खरेदी बंद असली तरी शासनाने हा कापूस खरेदी करण्याचे निदान आश्‍वासन दिले तरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अन्यथा व्यापारी मनमानी दराने त्याची खरेदी करतील.
- गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ, नागपूर.

News Item ID: 
820-news_story-1586486091-519
Mobile Device Headline: 
राज्यात शेतकऱ्यांच्या घरात ८० लाख क्‍विंटल कापूस पडून
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi eighty lakh quintal cotton in farmers stocks. start direct repurchase
Author Type: 
External Author
विनोद इंगोले
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, कापूस, खरीप, महाराष्ट्र, Maharashtra, हमीभाव, Minimum Support Price, विदर्भ, Vidarbha, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
eighty lakh quintal cotton in farmers stocks. start direct repurchase
Meta Description: 
eighty lakh quintal cotton in farmers stocks. start direct repurchase नागपूर ः लॉकडाउनमुळे शासकीय कापूस खरेदी बंद आहे. दरवाढीच्या अपेक्षेने ७८ ते ८० लाख क्विंटल कापसाचा घरात साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे. येत्या खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशांची सोय कशी करावी, तसेच कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

0 comments:

Post a Comment