महाराष्ट्रातील बहुतांशी भागात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस तर काही भागात ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तापमानात गतीने वाढ होत जाईल. सूर्यप्रकाशाचा कालावधी १२ तासांपेक्षा अधिक राहील. रात्रीचे तापमानही अधिक राहील. यापुढील काळात प्रखर उष्णता जाणवू लागेल.
दक्षिण तसेच उत्तर भारतातील तापमान वाढत राहिल्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीस दक्षिण व उत्तर भारतावर १००८ हेप्टापास्कल इतका समान हवेचा दाब राहील. आठवड्याच्या मध्यंतरानंतर उत्तर भारतातील हवेचा दाब कमी होऊन १००४ हेप्टापास्कल इतका राहील. साहजिकच वारे दक्षिणेकडून उत्तर दिशेस वाहतील. नंतर वायव्य भारतावरील हवेचा दाब कमी होऊन बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्रावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल पर्यंत वाढेल. शुक्रवार (ता. २४) रोजी संपूर्ण नैऋत्य दिशेकडून हवेचा दाब वाढेल, या सर्व बाबी मान्सूनच्या पावसासाठी पोषक आहेत. या वर्षी प्रदूषणाची पातळी कमी झाल्याने या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागांत पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. तसेच यापूर्वीच्या ५० वर्षापेक्षा हे वर्ष वेगळे असून प्रदूषण विरहीत हवा असल्याने मान्सून वेळेपूर्वी दाखल होऊन चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकूणच या वर्षाची हवामान स्थिती अनुकूल आहे.
कोकण
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी २५ मि.मि. तर काही दिवशी ८ ते १५ मि.मि. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ५७ ते ६० टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६७ ते ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यात २५ ते २७ टक्के तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ते ३५ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक व धुळे जिल्ह्यात ४ ते ६ मि.मि. पावसाची शक्यता आहे. या सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २५ टक्के
राहील.
मराठवाडा
उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात मंगळवार (ता. २१) रोजी ३ ते ७ मि.मि. पावसाची शक्यता असून वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर लातूर व बीड जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५९ टक्के तर लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ६३ ते ६४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किलोमीटर राहील.
पश्चिम विदर्भ
अमरावती जिल्ह्यात सोमवार (ता. २०) रोजी ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य महाराष्ट्र
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. वर्धा जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २५ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३० टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता कमी
आहे.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २५ ते ४० मि.मी. तर सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात १३ ते १३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात अल्पशा ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, सांगली व सातारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तर सोलापूर व नगर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३१ टक्के राहील.
कृषी सल्ला
- जमिनीची पूर्व मशागत करताना नांगराची पाळी देऊन कुळवाची पाळी द्यावी.
- पूर्वीच्या पिकांची धसकटे गोळा करावीत. जमिनीचे सपाटीकरण करावे.
- जमिनीची बांध बंदिस्ती करावी. डोंगर उतारावर जलसंधारणाची कामे करावीत.
- शेततळ्यांची कामे पूर्ण करावीत.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

0 comments:
Post a Comment