द्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत. द्राक्षांमध्ये कॅलरीज, फायबर आणि जीवनसत्त्व क, ई आढळतात.द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
- मायग्रेनच्या त्रासावर द्राक्ष गुणकारी असते. द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरते. नियमित द्राक्ष रसाचे सेवन केल्यास मायग्रेन त्रास कमी होतो.
- उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना द्राक्ष खाणे फायदेशीर ठरते. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून ३ ते ४ वेळा द्राक्षाचे सेवन करावे.
- द्राक्षामध्ये ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक आम्ल यांसारखे पोषकघटक असतात. त्यामुळे अनेक आजारांवर द्राक्ष खाणे लाभदायी मानले जाते. टीबी, कर्करोग आणि रक्तातील संसर्ग यांसारख्या आजारांवर द्राक्ष फायदेशीर आहे.
- मधुमेह असलेल्यांसाठी द्राक्ष खाणे लाभदायी आहे. द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
- भूक लागत नसल्यास द्राक्षाचा रस पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
- शरीरात रक्त कमी असल्यास एक ग्लास द्राक्ष रसात २ चमचे मध घालून प्यावे. त्यामुळे ॲनेमिया दूर होण्यास मदत होते. ॲनेमियामुळे येणारा थकवा कमी होऊन तरतरी येते.
संपर्क - प्रा. सागर नागरगोजे, ९६८९२२०००८
प्रा. शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२
(आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

0 comments:
Post a Comment