Wednesday, April 1, 2020

मराठवाडा, विदर्भात ‘पुर्वमोसमी’ पाऊस सुरूच 

पुणे - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवसांपासून सातत्याने पुर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. उशिराने काढणीस आलेल्या रब्बी पिकांसह फळपिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने पिकांची दाणादाण उडविली. मंगळवारी (ता.३१) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, संत्रा पिकांचे नुकसान झाले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी १९, जालना जिल्ह्यातील १७, बीड जिल्ह्यातील १८ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये मंगळवारी (ता.३१) पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. जालना, बीड जिल्ह्यातही काही मंडळात जोरदार पाऊस पडला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्या. सध्या उशिरा पेरणी झालेल्या पिकांची काढणी, मळणी सुरू असून, या पिकांचे अधिक नुकसान होत आहे. जोरदार वारे वाहत असल्याने फळपिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये वादळी वारे, पावसामुळे शेतीपिके तसेच फळपिकांचे नुकसान झाले. 

Coronavirus : पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा केंद्रे बंदच

अकोला जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी, बुलडाणा जिल्‍ह्यात चिखली, खामगाव, मेहकर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पुर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पातूर तालुक्यातील चान्नी परिसरात मंगळवारी दुपारी चार वाजेनंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तासभर सुरु राहिलेल्या या पावसामुळे लिंबू, सीताफळ, पेरू या फळबागांचे नुकसान झाले. पातूर तालुक्यातील सायवणी, सुकळी परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. तसेच विवरा,चरणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील कलिंगड, खरबूज, लिंबू , पपई, भाजीपाला पिके व तसेच कांदा पीक भुईसपाट झाले. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात भाजीपाला, लिंबू, संत्रा आदी पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अशी आहे स्थिती 
- भाजीपाला, फळपिकांचे होतेय मोठे नुकसान. 
- अकोल्यातील पातूर तालुक्यात गारपीट. 
- कलिंगड, पेरू, पपई, सिताफळ, खरबुजाला फटका.



0 comments:

Post a Comment