Wednesday, May 6, 2020

मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात येणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात सध्या केवळ २५ ते ३० टक्केच व्यापारी माल मागवत आहेत. परिणामी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कांदा-बटाट्याची आवकही थांबली असल्याने हे बाजार नावापुरतेच सुरू असल्याची स्थिती आहे. मात्र बाजारात माल येत नसला, तरी मालाच्या गाड्या थेट मुंबई आणि उपनगरात जात असल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

घाऊक कांदा-बटाटा बाजारात नेहमी सर्व मिळून १६० ते १८० गाड्या माल येत असतो. आता ही आवक ४० ते ५० गाड्यांवर आली आहे. हीच परिस्थिती भाजीपाला बाजारातही आहे. येथे ५०० ते ६०० गाड्यांऐवजी केवळ ८० ते ९० गाड्या येत आहेत. सध्या बाजारात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेक व्यापारी, अधिकाऱ्यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अनेक व्यापाऱ्यांनी आपला व्यापार बंद ठेवला आहे. जो काही थोडा माल बाजारात येतो, तितकाच विकला जात आहे. त्यामुळे बाजारात होणारी मालाची आवक थांबल्यातच जमा आहे.
असे असले, तरी किरकोळ बाजारातील मालाचा पुरवठा मात्र कायम आहे.

कारण भाजीपाला, कांदा-बटाटा या मालाचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होत आहे. बाजार समितीच्या आवारात न येता दररोज भाजीपाल्याच्या, कांदा-बटाट्याच्या ५०० ते ५५० गाड्या थेट जात आहेत. शिवाय अनेक सोसायट्यांमध्ये स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल मागवून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मागणीइतका पुरवठा होत आहे. परिणामी, घाऊक बाजारात माल कमी झाल्याचा कोणताच परिणाम किरकोळ बाजारावर झाल्याचे दिसत नाही.

News Item ID: 
820-news_story-1588776755-153
Mobile Device Headline: 
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात येणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात सध्या केवळ २५ ते ३० टक्केच व्यापारी माल मागवत आहेत. परिणामी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कांदा-बटाट्याची आवकही थांबली असल्याने हे बाजार नावापुरतेच सुरू असल्याची स्थिती आहे. मात्र बाजारात माल येत नसला, तरी मालाच्या गाड्या थेट मुंबई आणि उपनगरात जात असल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

घाऊक कांदा-बटाटा बाजारात नेहमी सर्व मिळून १६० ते १८० गाड्या माल येत असतो. आता ही आवक ४० ते ५० गाड्यांवर आली आहे. हीच परिस्थिती भाजीपाला बाजारातही आहे. येथे ५०० ते ६०० गाड्यांऐवजी केवळ ८० ते ९० गाड्या येत आहेत. सध्या बाजारात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अनेक व्यापारी, अधिकाऱ्यांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता अनेक व्यापाऱ्यांनी आपला व्यापार बंद ठेवला आहे. जो काही थोडा माल बाजारात येतो, तितकाच विकला जात आहे. त्यामुळे बाजारात होणारी मालाची आवक थांबल्यातच जमा आहे.
असे असले, तरी किरकोळ बाजारातील मालाचा पुरवठा मात्र कायम आहे.

कारण भाजीपाला, कांदा-बटाटा या मालाचा थेट पुरवठा किरकोळ बाजारात होत आहे. बाजार समितीच्या आवारात न येता दररोज भाजीपाल्याच्या, कांदा-बटाट्याच्या ५०० ते ५५० गाड्या थेट जात आहेत. शिवाय अनेक सोसायट्यांमध्ये स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांकडून थेट शेतीमाल मागवून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मागणीइतका पुरवठा होत आहे. परिणामी, घाऊक बाजारात माल कमी झाल्याचा कोणताच परिणाम किरकोळ बाजारावर झाल्याचे दिसत नाही.

English Headline: 
Agri Business News vegetables arrival become slow Mumbai Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, बाजार समिती, कोरोना, व्यापार, भाजीपाला बाजार, शेती
Twitter Publish: 
Meta Keyword: 
vegetables market committee Mumbai farmers consumer corona
Meta Description: 
vegetables arrival become slow मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात येणे बंद केले आहे. त्यामुळे बाजारात सध्या केवळ २५ ते ३० टक्केच व्यापारी माल मागवत आहेत. परिणामी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. कांदा-बटाट्याची आवकही थांबली असल्याने हे बाजार नावापुरतेच सुरू असल्याची स्थिती आहे. मात्र बाजारात माल येत नसला, तरी मालाच्या गाड्या थेट मुंबई आणि उपनगरात जात असल्याने भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे.

0 comments:

Post a Comment