रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या आंबा खरेदी-विक्री प्रक्रिया २३ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरीही काही बागायतदार आंबा आणून व्यावसायिकांना विकत आहेत. आतापर्यंत बाजार समितीच्या आवारात गेल्या आठ दिवसांमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांची उलाढाल झाली असून डझनला पावणेतीनशे ते साडेचारशे रुपये दर मिळाला आहे.
गेली दोन वर्षे बाजार समिती आवारात उभारलेल्या लाखो रुपयांच्या आंबा खरेदी-विक्री केंद्राला कोरोनातील लॉकडाऊनमुळे मुहूर्त मिळाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी पुढाकार घेतला होता. आंबा ने-आण करण्यासाठी बागायतदारांची होत असलेली पंचाईत लक्षात घेऊन ही व्यवस्था सुरू केली गेली.
२३ एप्रिलला याचा आरंभ झाला. पहिल्या दिवशी सुमारे पंधरा हजार रुपयांचे आंबे विक्रीला गेले. त्यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी, पणनचे अधिकारी आणि प्रक्रिया कशी चालते हे पाहण्यासाठी काही बागायतदार उपस्थित होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात सातत्याने याठिकाणी बागायतदारांनी हजेरी लावली.
आंबा खरेदीसाठी काही बागायतदारही सरसावले आहेत. गेल्या आठ दिवसात बाजार समितीत किरकोळ आंब्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. त्यामध्ये २ मे रोजी सुमारे १२० डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे साठ हजार रुपयांची उलाढाल झाली. २९ एप्रिलला २५३ डझनची विक्री झाली त्यातून ८१ हजार ९०० रुपये मिळाले. त्यादिवशी पेटी २१०० रुपये दर मिळाला. २८ ला २४७ डझन आंब्यांच्या विक्रीतून १ लाख ८ हजार रुपये मिळाले. या दिवशी साडेचारशे रुपये डझन इतका दर आंब्याला मिळाला होता.
२७ एप्रिलला १० हजार ९५० रुपयांची विक्री झाली असून ३० डझन आंबे उपलब्ध होते. यामध्ये आंब्याचा दर डझनला पावणेतीनशेपासून साडेचारशे रुपयांपर्यंत होता. मे महिना हंगाम असल्यामुळे नियमित विक्री सुरू राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. याबाबत बाजार समितीचे
सचिव किरण महाजन म्हणाले की, मोठ्याप्रमाणात उलाढाल होत नसली तरीही यंदाच्या परिस्थितीत आश्वासक चित्र आहे. खरेदी-विक्री सुरु झाली असून भविष्यात त्यात वाढ होईल.

0 comments:
Post a Comment