आजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी, खाद्य, पाणी व कामगार हे स्वतंत्र असावेत. शेड नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावे. रोगप्रसार प्रतिबंधासाठी विनाकारण कोणालाही प्रक्षेत्रावर प्रवेश देऊ नये.
कुक्कुटपालनामध्ये अनेक मार्गांनी रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता उपचारापेक्षा प्रतिबंधास अधिक महत्त्व आहे.
अंड्यांमार्फत प्रसार
रोग प्रसार एम्ब्रीओमार्फत पिलांमध्ये होतो. यामध्ये सालमोनेल्लोसीस, मायकोप्लाझमोसीस, इन्फेक्शियस ब्रॉंकायटीस, फाउल टायफॉइड, रानीखेत आजारांचा समावेश होतो. प्रसार टाळण्यासाठी हॅचरीजमध्ये योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हॅचरीजमधून प्रसार
अंडी व कोंबडी विष्ठा, मूत्र यांचा अंड्यांच्या कवचाबरोबर संपर्क येतो. यामुळे अशा अंड्यांना गादी साहित्य, श्वसननलिकेतील स्राव, उपकरणे इत्यादींमार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो. यामध्ये स्ट्रेप्टोकोकोसीस, ई कोलाय इन्फेक्शन, प्रोटीओसीस, सालमोनेलोसीसचा प्रसार टाळण्यासाठी योग्य प्रकारची उपाययोजना हॅचरीज तयार करताना करावी.
हवेमार्फत रोगप्रसार
- कोंबड्यांना श्वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्वसनमार्गातील कण, स्राव, जंतू हवेत सोडले जातात.मायकोप्लाझमोसीस, लॅरीन्जीओट्रकायटीस, रानीखेत आजार इत्यादी.
- हवेमार्फत रोगप्रसार टाळण्यासाठीही आजारी कोंबड्यांना वेगळे ठेवून व्यवस्थापन आणि उपचार करावेत. त्याचबरोबर आजारी कोंबड्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे, बूट यांचा वापर करणे बंधनकारक करावे. शेडमध्ये हवा खेळती राहावी, आर्द्रता व वास वाढू देऊ नये.
माश्या, डासांद्वारे रोगप्रसार
डास, गोचीड, पिसवा, माश्या इत्यादींमार्फत रोगप्रसार होतो. सदर कीटक आजारी कोंबड्यांपासून जंतूंचा प्रसार निरोगी कोंबड्यांपर्यंत करण्याचे काम करतात. या कीटकांबरोबरच उंदीर, इतर पक्षीसुद्धा रोगप्रसाराचे काम करतात.
उपाययोजना
- रोगप्रसार टाळण्यासाठी डास, गोचीड, पिसवा, माश्या यांचा प्रतिबंध करावा.
- शेडच्या आजूबाजूला पाणी साठून दलदल होणार नाही, शेड कोरडे राहील याची काळजी घ्यावी.
- शेडमध्ये पक्षी, उंदीर येऊ नयेत म्हणून उपाययोजना करावी. यासाठी कीटकनाशक फवारणी, माश्यांसाठी ट्रॅप या बाबी उपयोगी पडतात.
साहित्य, उपकरणाद्वारे रोगप्रसार
खाद्य-पाण्याची भांडी, खाद्याची पोती, पायातील चपला/बूट, कपडे, अंड्याचे ट्रे, कोंबड्यांचे पिंजरे इत्यादींमार्फत रोगप्रसार होऊ शकतो.
उपाययोजना
- रोगप्रसार टाळण्यासाठी स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे. ॲप्रन, हातमोजे यांचा वापर करावा. शेडजवळ वाहने आणण्यास प्रतिबंध करावा.
प्रक्षेत्रावर होणारा रोगप्रसार
- जुने कुक्कुट प्रक्षेत्र आणि ज्या ठिकाणी स्वच्छता दुर्लक्षित केली जाते अशा ठिकाणी रोगांचे जीवजंतू सतत असतात. कमी वयाची पिले रोगांना लवकर बळी पडतात. यामध्ये इन्फेक्शियस बरसल डिसीज (गंबोरो), सायमोनेलोसीस, मरेक्स आजार, स्टेफायलोकोकोसीस, ई कोलाय इन्फेक्शन, कॉक्सीडीओसीस यांचा समावेश होतो.
- प्रक्षेत्रावरील प्रभावी स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यक्रम रोगप्रसार टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. कोंबड्यांचा एकमेकांसोबत येणारा संपर्क हे रोग प्रादुर्भाव वाढवण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आजारी कोंबडी दुसऱ्या चांगल्या कोंबडीच्या संपर्कात आली की आजारी कोंबडीचा स्राव, लाळ, मूत्र, विष्ठा तसेच आजारी कोंबड्यांच्या शरीरावर असलेले घाव, स्नायू यांच्याद्वारे रोगप्रसार होतो किंवा जखमा, डोळ्यांचा पडदा, श्लेषमल पटल (नाक, तोंड) याद्वारेही रोगप्रसार होऊ शकतो. काही आजार एकमेकांना घासणे, चावा घेणे, नाकाशी संपर्क याद्वारे प्रसार होऊ शकतो.
उपाययोजना
- रोगप्रसार टाळण्यासाठी प्रक्षेत्रावर आजारी कोंबड्या आणि निरोगी कोंबड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे.
- आजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी, खाद्य, पाणी व कामगार हे स्वतंत्र असावेत. आजारी कोंबड्यांच्या वस्तू, कामगार यांचा चांगल्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी वापर करू नये.
- शेड नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावे.
- मोठ्या कोंबड्या जीवजंतूंचा वाहक म्हणून कार्यरत असतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये सर्वसाधारणपणे जीवजंतू पचनसंस्थेमध्ये स्थानबद्ध असतात. ज्या वेळी त्यांच्या शरीरावर ताण येतो त्या वेळी कोंबड्या रोगाची लक्षणे दाखवतात. अशा कोंबड्या इतर निरोगी कोंबड्यांच्या संपर्कात येऊन रोगप्रसार होतो. यामध्ये मायकोप्लाझमोसीस फाऊल टायफॉइड, कोरायझा, सालमोनेलोसीस, इन्फेक्शियस ब्रॉंकायटिस, इन्फेक्शियस लॅरीन्जीओट्रकायटीस, रानीखेत आजार, ऊवा, पिसवा, गोचिड प्रादुर्भाव इत्यादी आजारांचा समावेश होतो.
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५११४
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

0 comments:
Post a Comment