अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.११) तुरीला सरासरी ५८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. तुरीची २३१ क्विंटल आवक झाली होती, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात सध्या पेरणी तसेच शेतीतील कामांची लगबग सुरू आहे. हंगामातील कामे जोरावर असल्याने बाजार समितीत धान्याची आवक कमी आहे. शनिवारी तुरीची २३१ क्विंटल आवक होती. तुरीला किमान ५००० ते कमाल ५८६५ रुपये तर सरासरी ५८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनची ८०८ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला किमान ३४०० तर कमाल ३६५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनला सरासरी ३६०० रुपये क्विंटल असा दर होता.
बाजार समितीत हरभऱ्याची २४८ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३९५० ते ४२७५ रुपये क्विंटल असा दर मिळाला. हरभऱ्याला सरासरी ४२०० रुपये क्विंटल असा दर होता. बाजारात उडिदाची आवक कमी आहे. उडदाला किमान २००० ते कमाल ६००० रुपये क्विंटल असा दर होता. उडदाची १०७ क्विंटल आवक होती. मुगाला किमान ४२०० ते कमाल ६१०० रुपये तर सरासरी ५८०० रुपये क्विंटल असा दर होता. लोकल गहू १६९० ते १८५० रुपये क्विंटल या दराने विक्री झाला. या गव्हाची १४८ क्विंटल आवक झाली. ज्वारीची सात क्विंटल आवक होती. ज्वारीला किमान ९०० ते कमाल १००० रुपये क्विंटल तर सरासरी ९५० रुपये क्विंटल असा दर होता. शनिवारी कापसाची १५३३ क्विंटल आवक झाली होती. कापसाला ५२५० ते ५३५५ रुपये तर सरासरी ५३५० रुपये क्विंटल असा दर होता.

0 comments:
Post a Comment