नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत देशभरात नाफेडच्या माध्यमातून १ लाख टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. गुरुवार(ता.३०) अखेर ८६ हजार टन कांदा खरेदी पूर्ण झाली आहे. तर बाकी खरेदी लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश व गुजरात राज्यात कांदा खरेदी झाली. त्यामध्ये सर्वाधिक खरेदी महाराष्ट्रात झाली.
‘नाफेड’ने कांद्याची खरेदी थेट लिलाव पद्धती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रासाठी ८० हजार, गुजरात व मध्य प्रदेशसाठी प्रत्येकी १० हजार टन खरेदीचा लक्षांक निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात ७२ हजार टन खरेदी पूर्ण झाली आहे, तर आठ हजार टन खरेदी बाकी आहे. तसेच मध्य प्रदेशने १० हजार टनांचा लक्षांक पूर्ण केला आहे.
गुजरातने अवघी ४ हजार टन खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील खरेदी अपूर्ण राहिल्याने हा लक्षांक महाराष्ट्रात पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाराष्ट्रात ८६ हजार टन खरेदी होऊ शकते. ही खरेदी जरी पूर्ण होणार असली तरीही राज्यात उत्पादित कांद्याच्या तुलनेत खरेदी नगण्य आहे.
तसेच नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरूनही दरात अपेक्षित दरात सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा एकदा ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा खरेदी वाढवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट आणि खरेदी (लाख टनांत)
| राज्य | उद्दिष्ट | खरेदी |
| महाराष्ट्र | ८० | ७२ |
| मध्य प्रदेश | १० | १० |
| गुजरात | १० | ४ |

0 comments:
Post a Comment