ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
आंबा
- वाढीची अवस्था
- १० वर्षावरील हापूस जातीच्या आंबा झाडास नियमित व लवकर फळे धरण्यासाठी कलमांच्या वाढीच्या विस्तारानुसार पॅक्लोब्युट्राझोल या वाढ नियंत्रकाची झाडाच्या आकारानुसार योग्य प्रमाणात आळवणी पूर्ण करून घ्यावी.
- ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
- पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.ली. - पावसाची उघडीप पाहून फवारणी करून घ्यावी.
काजू
- वाढीची अवस्था
- अति पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाश यामुळे बुरशीला पोषक वातावरण निर्माण होत आहे. काजू बागेमध्ये पानगळ आणि फांद्याची मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी फवारणी मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे पावसाची तीव्रता कमी असताना संपूर्ण झाडांवर फवारणी करावी.
- काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पालवीतील रस शोषून घेते, त्यामुळे नवीन पालवी सुकून जाते.
नियंत्रणासाठी फवारणी प्रती लीटर पाणी - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. (फक्त ॲग्रेस्को शिफारस आहे.)
- काजूच्या ४ वर्षावरील प्रती कलमास ४० किलो शेणखत/हिरवळीचे खत, २ किलो युरिया, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणे खते कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चरामध्ये द्यावीत. चर बुजवून खते त्वरीत मातीआड करावीत. वर दिलेली खताची मात्रा चार वर्षापेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी पाव पट, दुसऱ्या वर्षी अर्धा पट आणि तिसऱ्या वर्षी पाऊण पट या प्रमाणे खते पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.
नारळ
- वाढीची अवस्था व फळधारणा
- नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांना मातीची भर द्यावी. बाग तणमुक्त ठेवावी.
- नवीन लागवड केलेल्या रोपांवर कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यावर बोर्डोमिश्रण १ टक्के या प्रमाणे फवारणी करावी.
- जुन्या नारळ बागेत सुकलेल्या झावळ्या, वांझ पोयी, पालापाचोळा गोळा करून बागेची स्वच्छता करावी. अति पावसामुळे कोंब कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बागेचे निरीक्षण करून असा प्रादुर्भाव आढळल्यास शेंड्याकडील भागावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
सुपारी
- फळधारणा
- सुपारीच्या ३ वर्षावरील प्रती झाडास १० किलो शेणखत, १२ किलो हिरवळीचे खत, १६० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खते झाडाच्या बुंध्यापासून १ मीटर अंतरावर बांगडी पद्धतीने चर घेवून द्यावीत. वर दिलेली खताची मात्रा तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/३ पट आणि दुसऱ्या वर्षी २/३ पट या प्रमाणे द्यावी.
- सुपारी तडकण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शिफारस केलेल्या खतांबरोबर ६०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये (बोरॉन ६० ग्रॅम, झिंक ३०० ग्रॅम, मॅंगनीज ६० ग्रॅम, लोह १२० ग्रॅम आणि कॉपर ३० ग्रॅम) पहिल्या हप्त्यात जमिनीतून द्यावीत. पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत.
- हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे सुपारीवर कोळेरोगाचा प्रादुर्भाव फळांच्या देठावर दिसून येतो. या बुरशीजन्य रोगामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. फळांचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पानांच्या बेचक्यात १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी पावसाची तीव्रता कमी असताना करावी.
संपर्क- ०२३५८ - २८२३८७
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा व कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)
News Item ID:
820-news_story-1597322514-226
Mobile Device Headline:
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (कोकण विभाग)
Mobile Body:

English Headline:
Agriculture news in marathi agri advisory by dapoli university
Twitter Publish:

0 comments:
Post a Comment