निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या रानभाज्या पोटदुखी, श्वसनलिका दाह, यकृत विकार, सर्दी, खोकला आदी विकारांवर उपयुक्त आहेत.
आघाडा
औषधी उपयोग
- जेवणापूर्वी आघाड्यांचा काढा घेतल्यास पाचक रस वाढतो. जेवल्यानंतर घेतल्यास आम्लता कमी होते.
- रातांधळेपणात उपयुक्त.
- भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, अपचन, आमांश, रक्तरोगावर उपयोगी.
उपयुक्त भाग- कोवळी पाने
पाककृती- आघाड्यांच्या कोवळ्या पानांची भाजी
हादगा
औषधी उपयोग
- वातदोष कमी होण्यास उपयुक्त.
- भूक लागत नसल्यास तसेच पोट साफ होत नसल्यास अत्यंत गुणकारी.
- स्त्रियांची मासिक पाळी नियमित येण्यासाठी तसेच मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर उपयुक्त.
- रातांधळेपणात उपयुक्त.
- ठेचाळलेल्या भागांवर पानांचा लेप लावतात.
उपयुक्त भाग- फुले, शेंगा.
पाककृती- फुलांची भाजी, भरीत, शेंगाची भाजी
भोकर
औषधी उपयोग
- अतिसारात फळे उपयुक्त. या भाजीमुळे आतड्यांची ताकद वाढते. पुष्टी येते.
- लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले.
उपयुक्त भाग- फळे
पाककृती- लोणचे, भाजी
बांबू
औषधी उपयोग
भूक व पचनशक्ती वाढवते
- उपयुक्त भाग- कोवळे कोंब, वास्ते
- पाककृती- कोंबाची भाजी, लोणचे.
भुई आवळा
औषधी उपयोग
- लघवीचे प्रमाण वाढते, दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मुतखडा, जंतू संसर्ग आदी विकारांवर या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो.
- रक्तदाब, चक्कर येणे या आजारावर उपयुक्त.
- थंडी ताप तसेच सर्दी, खोकल्यावर भाजी उपयुक्त.
उपयुक्त भाग- पाने, कोवळे खोड, फांद्या
पाककृती- भाजी
मायाळू
औषधी उपयोग
- सांध्याच्या वेदना व सूज कमी करण्यासाठी.
- रक्त विकारात वाढलेली रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त.
उपयुक्त भाग- पाने
पाककृती- भाजी, पराठा, भजी
कुर्डू
औषधी उपयोग
मूतखडा व लघवीच्या विकारावर उपयुक्त, शक्तिवर्धक
- उपयुक्त भाग- कोवळी पाने
- पाककृती- भाजी, पराठा, भजी
बाफळी
औषधी उपयोग
पोट दुखी व पोट साफ होण्यासाठी, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी.
- उपयुक्त भाग- भाजी
- पाककृती- भाजी, पराठा, भजी
कोहरेल
औषधी उपयोग
रक्तशुद्धी.
- उपयुक्त भाग- कोळा पाला
- पाककृती- भाजी
पेंढारी
औषधी उपयोग
- भाजी थंड गुणधर्माची आहे.
- पोटात कळ मारून जुलाब होत असल्यास, आव पडत असल्यास कच्चा फळांची भाजी खावी.
- लघवी कमी होत असल्यास, लघवीची जळजळ होत असल्यास भाजी खावी.
उपयुक्त भाग- फळे
पाककृती- फळांची भाजी
रानभाज्यांचे वर्गीकरण
| प्रकार | नावे |
| रानभाज्या | शेऊळ, लोथ, तरोटा, चाईचा वेल, कुर्डू, बाभळी, तेरा, घोळ, माट, चंदन बटवा |
| रानफळे | आळीव, पेटारा, टेंभुर्णी, चंदन बटवा, करटोली, चीचुडी, भोकर |
| बिया | डोंगरजीरा, कुकुरवळ, तोरण |
| फुले | हादगा, मोह, शिरी, शेवगा |
| बुरशी | भूछत्र, भुईफोड |
| कंद | करांदा, चाळीचे कंद, शेवूळ, वळीचे कंद, रानसुरण, वास्ते, कोणफळ |
| शेंगा | टॅटू, हादगा, खरशिंग |
| कोवळे खोड | डिनी, मोरडीनी |
संपर्क- रूपाली देशमुख, ८६९८७०११७७ ,
उत्तम सहाणे, ७०२८९००२८९. (कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल,जि.पालघर)

0 comments:
Post a Comment