Saturday, August 15, 2020

उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,लोकरी मावा आणि हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादनात घट येते. किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत. 
 
खोड कीड 
लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत प्रादुर्भाव. 
हलकी जमीन, कमी पाणी, हंगामबाह्य लागवड, जास्त तापमानात प्रादुर्भाव वाढतो. 
उसाचा पोंगा वाळलेला दिसतो. पोंगा हाताने ओढल्यास सहजासहजी उपटून येतो. 

नियंत्रण 

  • बाळबांधणी वेळेवर करावी.
  • लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्ड १० ते १५ दिवसाच्या अंतराने ५ ते ६ वेळा वापरावीत. 
  • हेक्टरी ५ कामगंध सापळे (ई.एस.बी.ल्यूर)  लावावेत.
  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ टक्के) दाणेदार १८.७५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) दाणेदार २५ किलो प्रति हेक्टरी द्यावे. 

फवारणी ः  (प्रति दहा लिटर पाणी)

  • क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३.७५ मिलि किंवा 
  • क्लोरपायरीफॉस (२० टक्के ईसी) २० मिलि किंवा
  • क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी)२० मिलि (ॲग्रेस्को शिफारस)

कांडी कीड 
प्रादुर्भाव कांडी तयार झाल्यापासून ऊस तोडणीपर्यंत दिसतो. 
भरपूर तापमान, कमी आर्द्रता आणि कमी पाऊस यामुळे कांडी किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. वाढ कमी होते, कांड्या लहान होतात,  पांगश्या फुटतात. 
पाचट काढले असता अळी दिसून येते. 
नियंत्रण  

  • कीडविरहीत बेण्याची लागवड करावी. 
  • जास्त प्रादुर्भाव असलेल्या शेतात ५, ७ व ९ महिन्यांनी वरील हिरवी पाने ठेवून खालच्या बाजूची पाने काढून टाकावीत. जास्त नत्रयुक्त खते टाळावीत.
  • पाणथळ ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा करावा. 
  • लागवडीनंतर ४ महिन्यांनी प्रति हेक्टरी ५ ते ६ ट्रायकोकार्ड १५ दिवसांच्या अंतराने वापरावीत. 
  • हेक्टरी ५ कामगंध सापळे (आय.एन.बी.ल्यूर)  लावावेत. 
  • प्रति हेक्टरी दाणेदार क्विनॉलफॉस ३० किलो याप्रमाणे जमिनीत मिसळावे.(ॲग्रेस्को शिफारस)

शेंडे कीड 
प्रादुर्भाव उगवणीपासून तोडणीपर्यंत आढळून येतो. 
भरपूर आर्द्रता, मध्यम तापमान आणि उशिरा जास्त येणारा पाऊस यामुळे प्रादुर्भाव वाढतो. 
शेंडा वाळतो, पानावर लहान आडवी एका रेषेत छिद्रे दिसतात. शेंडा सहजासहजी उपसून येत नाही. 
शेंडा वाळल्यामुळे बाजूचे डोळे फुटतात. उसाचा खराट्यासारखा आकार होतो. 
नियंत्रण 

  • फुले ट्रायकोकार्ड ५ ते ६ प्रति हे १५ दिवसांच्या अंतराने वापरावेत. 
  • प्रति हेक्टरी पाच कामगंध सापळे (टी. एस. बी.ल्यूर) वापरावेत. 
  • प्रति हेक्टरी क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जी.आर) १८.७५ किलो जमिनीत मिसळून द्यावे.(ॲग्रेस्को शिफारस)

पिठया ढेकूण
कांडीवर पाचटाखाली लांबट गोल आकाराची, लालसर गुलाबी रंगाची व अंगावर मेणचट आवरण असलेली पिल्ले दिसतात. 
प्रादुर्भावामुळे उसाची वाढ मंदावते. 
नियंत्रण 

  • बेणेमळयातील निरोगी आणि कीडमुक्त बेण्याची निवड करावी.
  • बेणे प्रक्रिया ः  डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २६५ मिलि प्रति १०० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात १० ते १५ मिनिटे बेणे बुडवावे. 
  • शिफारशीपेक्षा अधिक नत्र वापरू नये. 
  • प्रादुर्भावग्रस्त उसाचे खालील वाळलेले पाचट काढावे. 

फवारणी ः (प्रति दहा लिटर पाणी)

  • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २.६ मिलि (ॲग्रेस्को शिफारस) 

पांढरी माशी 
निचरा नसलेल्या जमिनी, दलदलीच्या क्षेत्रात  प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. 
पिल्ले व प्रौढ पानांच्या मागील बाजूने रसशोषण करतात. पाने पिवळसर गुलाबी दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने वाळतात. 
पिल्ले पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. त्यामुळे काळी बुरशी वाढते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. वाढ खुंटते, साखर उतारा कमी होतो. 
नियंत्रण 

  • पाणी साचत असल्यास चर काढून निचरा करावा. पिकाला ताण पडल्यास पाणी द्यावे.
  • रासायनिक खतांची मात्रा शिफारशीनुसार व योग्य वेळी विभागून द्यावी. 
  • प्रादुर्भावग्रस्त पाने कापून नष्ट करावीत. त्यामुळे पुढील प्रादुर्भावाला आळा बसतो.
  • व्हर्टिसिलीअम लेकॅनी (फुले बगीसाईड) १ किलो आणि १ लिटर दूध प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 

फवारणी ः (प्रति लिटर पाणी)

  • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २.५ मिलि(ॲग्रेस्को शिफारस) 

हुमणी 
प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. ऊस सहजासहजी उपसून येतो. 
मुळे खाल्लेली दिसून येतात. ऊस उपटला असता पिवळसर पांढऱ्या रंगाच्या अळ्या दिसून येतात. 
नियंत्रण 
शेतात केरोसीन मिश्रीत पाण्याच्या टाक्या ठेऊन त्यावर बल्ब लावल्यास, भुंगेरे त्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडून त्यांचे नियंत्रण होईल. 
लागवड करताना प्रति हेक्टरी मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना २५ किलो शेण खतातून किंवा शेणकाला करुन लागवडीच्या वेळी सरीमधून दिल्यास, हुमणीवर बुरशी वाढून प्रादुर्भाव कमी होतो.(ॲग्रेस्को शिफारस)
निंबोळी पेंडीचा चुरा २ टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावा. 
कीडनाशकांचा वापर 

  • हुमणी ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्टरी फिप्रोनिल (०.३ जीआर) २० किलो सरीमध्ये शेणखतामधून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे. (ॲग्रेस्को शिफारस) 
  • इमिडॉक्लोप्रिड (४० टक्के)+ फिप्रोनिल (४० टक्के डब्ल्यूजी) हे संयुक्त कीडनाशक एकरी १६० ग्रॅम प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून नोझल काढलेल्या पंपाने ओळीत आळवणी करावी. 
  • क्लोरपायरीफॉस (२० ईसी) १००० मिलि किंवा इमिडाक्लोप्रिड (२०० एस.एल.) २५० मिलि प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी उसाच्या बेण्याजवळ नाळे मारून आळवणी करावी. लगेच हलके पाणी द्यावे. (ॲग्रेस्को शिफारस) 
  • शेताजवळील कडुनिंब आणि बाभळीच्या झाडावरील भुंगेरे नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस ४ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

लोकरी मावा 

  • पिल्ले व प्रौढ पानाखाली स्थिर राहून अणकुचीदार सोंडेने अन्नरस शोषतात. 
  • प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने आकुंचित होऊन वाढ खुंटते. 

नियंत्रण 

  • कीडग्रस्त बेणे वापरु नये. 

  • पट्टा किंवा रुंदी सरी पद्धतीने लागवड करावी. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी व नत्र खत द्यावे. 
  • डिफा अ‍ॅफिडीव्होरा या परभक्षी मित्र कीटकाच्या १००० अळ्या किंवा  मायक्रोमसच्या (मगरी अळी) २५०० अळ्या प्रति हेक्टरी सोडाव्यात. 
     
- डॉ.आण्णासाहेब तांबे,७५८८६९५३७५
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जि. सातारा)

News Item ID: 
820-news_story-1597406234-969
Mobile Device Headline: 
उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे एकात्मिक नियंत्रण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture Agricultural News Marathi article regarding pest control in sugarcane.
Author Type: 
External Author
डॉ. आण्णासाहेब तांबे,डॉ. भरत रासकर
Search Functional Tags: 
ऊस, हुमणी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article regarding pest control in sugarcane.
Meta Description: 
article regarding pest control in sugarcane. ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,लोकरी मावा आणि हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे पिकाची वाढ खुंटते, उत्पादनात घट येते. किडींच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत. 

0 comments:

Post a Comment