Saturday, August 22, 2020

खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुका

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना सुपरिचित असतोच. सुकामेव्यामध्ये काळा मनुका आणि बेदाण्यांचा समावेश होतो. सुक्यामेव्यामध्ये विशेष औषधी म्हणून काळा मनुका उत्तम कार्य करतो.

  • बाहेरचे खाणे, जेवणाच्या अनियमित वेळा यांमुळे पोटाच्या तक्रारी उद्‌भवतात. बद्धकोष्ठता निर्माण होते. अशावेळी सात-आठ काळे मनुके भिजत घालावेत आणि रात्री झोपताना त्या कोळून घेऊन गाळून घ्यावे. त्यात कोमट पाणी घालून त्याचे सेवन करावे. पोट साफ होण्यास मदत होते.
  • खूप उष्ण प्रकृती असल्यास, तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत घशाला कोरड पडून सारखी तहान लागते. अशावेळी दोन काळे मनुके आणि खडीसाखर तोंडात धरल्यास फायदा होतो.
  • पित्तामुळे जळजळ होत असल्यास, काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी ते कुसकरून पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड, साखर घालून सेवन करावे. पित्ताचा त्रास कमी होतो. मूत्र विर्सजनावेळी आग होत असल्यास, याचे सेवन केल्यास आराम मिळतो.
  • काळे मनुके पौष्टिक असतात. ताप येऊन गेल्यानंतर किंवा मोठ्या आजारानंतर जास्त प्रमाणात अशक्तपणा येतो. अशावेळी काळ्या मनुक्याचे सेवन करून दूध प्यावे.
  • खूप जणांना घोळणा फुटणे (नाकातून रक्त येणे) ही तक्रार असते. अशावेळी उष्णता कमी करणाऱ्या औषधांच्या जोडीला मनुका, ज्येष्ठमध, गुळवेल घालून काढा करावा. काढ्याच्या सेवनाने हा त्रास कमी होतो.
  • पित्तामुळे चक्कर येत असेल किंवा अंधेरी येत असल्यास, मनुका तुपावर परतून सैंधव लावून सेवन कराव्यात.
  • कोरडा खोकला, ठसका लागणे, आवाज बसणे, घसा खवखवून खोकला येणे अशा सर्व तक्रारींसाठी मनुका आणि खडीसाखर तोंडात धरावी.

पथ्य 
तेलकट, तुपकट, लोणचे, शिळे पदार्थांच्या सेवनाने पित्त आणि कफ वाढतो. त्यामुळे यांचे सेवन करणे टाळावे.

काळजी 

  • खोकला जास्त असेल, रक्त पडत असेल तर योग्य त्या तपासण्या करून योग्य औषधोपचार घ्यावा.
  • वारंवार चक्कर येत असल्यास, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या जरूर कराव्यात.

संपर्क- डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

News Item ID: 
820-news_story-1598099254-694
Mobile Device Headline: 
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुका
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi health benefits of Black Raisins
Author Type: 
External Author
विनीता कुलकर्णी
Search Functional Tags: 
साखर, आग, दूध
Twitter Publish: 
Meta Keyword: 
health, benefits, Black Raisins
Meta Description: 
health benefits of Black Raisins ​लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना सुपरिचित असतोच. सुकामेव्यामध्ये काळा मनुका आणि बेदाण्यांचा समावेश होतो. सुक्यामेव्यामध्ये विशेष औषधी म्हणून काळा मनुका उत्तम कार्य करतो.

0 comments:

Post a Comment