प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहील. औरंगाबाद, जालना व नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम, बीड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यात मध्यम तर लातूर जिल्ह्यात अतिशय हलका ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानूसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा मोठया प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
काही भागात ऊस, ज्वारी, मका, बाजरी यासारख्या पिकांवर नाकतोड्यांची पिल्ले मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. त्यांच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (५० टक्के) १ मिली किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के) १ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) १ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (१० टक्के) ०.२५ मिली किंवा फिप्रोनिल (५ टक्के) ०.२५ मिली किंवा मॅलॅथिऑन (५० टक्के) ३.७ मिली किंवा मॅलॅथिऑन (२५ टक्के) ७.४ ग्रॅम. या प्रमाणात पावसाने उघाड दिल्यास फवारणी करावी.
मका
- वाढीची अवस्था
- मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रती लीटर पाणी
- इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिली.
- पावसाची उघडिप पाहून फवारणी करावी.
- पाऊस झाल्यानंतर पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
केळी
- वाढीची अवस्था
- केळी पिकात ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रती लीटर पाणी
- कार्बेन्डाझिम (५० डब्ल्युपी) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (१० ईसी) १ मिली.
- पावसाने उघडिप दिल्यानंतर स्टिकर मिसळून फवारणी करावी.
- बागेतील अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
सिताफळ
- फुलधारणा ते फळधारणा अवस्था
- सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, निंबोळी तेल ५ मिली किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.ली किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी ४ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- पाऊस झाल्यानंतर फळबागेत पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
भाजीपाला
- वाढीची अवस्था
- पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा.
- भाजीपाला पिकास शिफारशीनुसार वरखताची मात्रा द्यावी.
फुलशेती
- वाढीची अवस्था
- ढगाळ वातावरणामुळे गुलाब फुलपिकावरील रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- नवीन लागवड केलेल्या फुलपिकातील तणांचे व्यवस्थापन करावे.
- पिकातील अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
संपर्क- डॉ. कैलास डाखोरे, ०९४०९५४८२०२
(कृषी विद्या विभाग व ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. )

0 comments:
Post a Comment