सध्याच्या पावसाळी वातावरणात ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असताना कांडी कूज, पोक्का बोईंग तसेच पानावरील तपकिरी ठिपके, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. रोगांची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात.
सध्या आडसाली ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे. तसेच पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पीक जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. कमी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस आणि आर्द्रता यामुळे काही भागात रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे. या रोगांची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
पोक्का बोईंग
बुरशी ः फ्युजॅरियम मोनिलीफॉर्मी
लक्षणे
- सुरुवातीस तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट पिवळसर पट्टे येतात.
- पाने सुकून आकसतात, आखूड होतात.
- कोवळी पाने रोगग्रस्त झाल्यास पूर्णपणे उघडली जात नाहीत. पुढील अवस्थेत पाने सडतात. एकमेकांत गुरफटतात. गळून पडतात.
- प्रार्दुभाव अग्रांकूरापर्यंत झाल्यास पोंगा मर किंवा शेंडा कुजण्याची लक्षणे दिसतात.
- रोगट कांड्यावर चाकूने काप मारल्यासारखे दिसते. उसाचा जोम कमी होतो.
उपाय
फवारणी ः प्रति लिटर पाणी
- कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
- मॅंकोझेब ३ ग्रॅम
तांबेरा
बुरशी ः पक्सीनिया मेलॅनाँसेफाला
लक्षणे
- सुरवातीच्या अवस्थेत पानांच्या दोन्ही बाजूस लहान लांबट आकाराचे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्याचा आकार वाढत जाऊन रंग लालसर तपकिरी होतो.
- ठिपक्याभोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा दिसते, त्यानंतर या जागी उंचवटे जाणवतात. असे ठिपके फुटून नारंगी तांबूस-तपकिरी रंगाचे बुरशीचे बीजाणू बाहेर पडतात.
- पानाच्या मागील बाजूस ठिपके दिसतात. ठिपके एकमेकात मिसळून पानांचा मोठा भाग व्यापतात.
- ठिपक्यांच्या पेशी मरतात. प्रकाशसंश्लेषण क्रिया खंडीत होते. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावल्यामुळे कांड्याची लांबी व जाडी कमी होते.
उपाय ः
फवारणी ः प्रति लिटर पाणी
- कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
- प्रॉपिकोनॅझोल १ मिलि किंवा
- मँकोझेब ३ ग्रॅम
लाल कूज
बुरशी ः कोलेटोट्रोकम फलकॅटम
लक्षणे
- पानांच्या मध्य शिरेवर गर्द लाल रंगाचे ठिपके दिसतात, कालांतराने हे ठिपके वाढत जाऊन रक्तासारखे लाल होतात. पानाच्या कडा गडद होऊन मधला भाग वाळतो. पान ठिपक्याजवळ चिरते.
- शेंड्याकडील तिसऱ्या व चवथ्या पानावर प्रार्दुभाव होतो. नंतर पूर्ण शेंडा वाळून मोडून पडतो.
- कांडी उभी चिरली असता आतील गाभा लाल रंगाचा झालेला दिसतो. रोगग्रस्त पेशीमध्ये पांढरट शेवाळी रंगाची बुरशी वाढते.
उपाय
- रोगाचे प्रमाण कमी असल्यास रोगग्रस्त ऊस उपटून जाळून टाकावा.
- कॉपर ऑक्सिक्लोराईड ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ओलावा असताना रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी.
पानावरील तपकिरी ठिपके
बुरशी ः सरकोस्पोरा लॉन्जिपस
लक्षणे
- लहान उसापेक्षा ७ ते ८ महिने वयाच्या उसामध्ये जास्त प्रार्दुभाव दिसतो.
- पानाच्या वरील बाजूस तपकिरी पिंगट ठिपके दिसतात. जुन्या पानांच्या दोन्ही बाजूवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी पिंगट ठिपके दिसतात. ठिपक्याभोवती पिवळसर वलय दिसते.
- प्रार्दुभाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात.
- ठिपक्यामधील पेशी मरतात, प्रकाशसंश्लेषण क्रिया खंडीत होते. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावल्यामुळे कांड्याची लांबी,जाडी कमी होते.
फवारणी
प्रति लिटर पाणी
- कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
- प्रोपिकोनॅझॉल १ मिलि किंवा
- मँकोझेब १ ग्रॅम
- डॉ. विलास करडे, ९४२०७७६१८३,
(राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर)

0 comments:
Post a Comment