Wednesday, December 2, 2020

खानदेशात केळीची खरेदी मंदावली

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. केळीची आवक कमी आहे. परंतु, उत्तरेकडील कमी मागणी, लॉकडाऊनची भीती, यामुळे केळीच्या बाजारात खरेदीदार सावध भूमिकेत आहेत. परिणामी, खरेदी रखडत सुरू आहे. 

दिल्ली, पंजाब, हरियाना व काश्मीर येथे केळीची डिसेंबरमध्ये चांगली मागणी असते. यंदाही मागणी आहे. परंतु, उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशातील महानगरांमध्ये लॉकडाऊनची भीती आहे. किरकोळ विक्रेते, तेथील मोठे खरेदीदार संभ्रमात आहेत. कोरोनाची समस्या वाढत आहे. त्यामुळे बाजारातही त्याचा परिणाम दिसत आहे. यामुळे आवक कमी असतानादेखील केळीची खरेदी रखडत सुरू आहे. त्यामुळे दरांवर परिणाम झाला आहे. 

यंदा सुरवातीपासून दर टिकून होते. कमाल दर १३५० रुपये प्रतिक्विंटल, एवढे झाले होते. मध्यंतरी किमान दर ६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. परंतु, उत्तरेकडून पुन्हा मागणी सुरू झाल्याने दिवाळीनंतर दरात सुधारणा झाली. गेल्या दोन तीन दिवसात कमाल दरात काहीशी घसरण दिसत आहे. दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीचे दर १००० ते १०५० रुपये आहेत. तर, कमी दर्जाच्या केळीचे दर किमान ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

आवक गेल्या सात - आठ दिवसात १० ट्रकनी (एक ट्रक १५ टन क्षमता) कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात प्रतिदिन १५० ट्रक केळीची आवक झाली. पुढील आठवड्यात ही आवक आणखी कमी होईल. खानदेशात सध्या जळगावमधील चोपडा, जळगाव, पाचोरा भागात काढणी सुरू आहे. तर धुळ्यातील  शिरपूर भागातही काढणी सुरू आहे. 

 स्थानिक विक्रीसाठी खरेदी सुरू 
सध्या कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. स्थानिक विक्रीसाठी (पुणे, मुंबई, ठाणे) खरेदी सुरू आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातून केळीची काढणी सुरू होण्यास आणखी महिनाभर वेळ लागणार आहे. लॉकडाउनची भीती व कोरोनाची समस्या आटोक्यात आल्यास दरात सुधारणा होऊ शकते, असे सांगण्यात आले.

News Item ID: 
820-news_story-1606918465-awsecm-117
Mobile Device Headline: 
खानदेशात केळीची खरेदी मंदावली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi Slow purchase for Banana in Khandesh
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, केळी, Banana, पंजाब, भारत, उत्तर प्रदेश, नगर, कोरोना, Corona, दिवाळी, पुणे, मुंबई, Mumbai, रावेर, मुक्ता
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Slow purchase for Banana in Khandesh
Meta Description: 
Slow purchase for Banana in Khandesh खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. केळीची आवक कमी आहे. परंतु, उत्तरेकडील कमी मागणी, लॉकडाऊनची भीती, यामुळे केळीच्या बाजारात खरेदीदार सावध भूमिकेत आहेत. परिणामी, खरेदी रखडत सुरू आहे. 

0 comments:

Post a Comment