औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकेत चढउतार असला तरी बाजरी, हरभरा, मका, तूर, गहू व सोयाबीनचे दर मात्र जवळपास स्थिर असल्याचे चित्र गत आठवडाभरात पाहायला मिळाले.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये २५ ते ३० एप्रिल दरम्यान बाजरीची एकूण ३५४ क्विंटल आवक झाली. १४ ते २०५ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी १२५० ते १५७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक ५८ क्विंटल झाली. ५ ते १८ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या हरभऱ्याचे सरासरी दर ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.
मक्याची एकूण आवक ६६५ क्विंटल झाली. ११ ते २५७ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मक्याचे सरासरी दर १३८७ ते १४६६ रुपये प्रतिक्विंटल दरम्याने राहिले. तुरीची आवक आठवडाभरात केवळ दोन वेळा झाली. अनुक्रमे तीन व आठ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या तुरीला सरासरी ५८५० ते ६२५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ज्वारीची आवक ४२२ क्विंटल झाली. ४२ ते १४८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ज्वारीचे सरासरी दर १९७५ ते २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
सोयाबीनला ६१०० रुपये दर
सोयाबीनची आठवड्यात तीन वेळा आवक झाली. दोन ते सात क्विंटल दरम्यान अगदीच नगण्य आवक झालेल्या सोयाबीनला सरासरी ५७८८ ते ६१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गव्हाची आवक ३३३ क्विंटल झाली.३५ ते १११ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाचे सरासरी दर १८८० ते १९०० रुपये प्रति क्विंटल राहील्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment