Monday, October 11, 2021

कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरु

कोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागातून ही आवक झाली. रताळ्याबरोबरच यंदाच्या हंगामातील गुळाच्या आवकेसही बाजार समितीत प्रारंभ झाला. 

बाजार समितीत रताळ्याची आवक साधारणपणे १०० ते २०० पोती इतकी आवक होत असते. पण नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही आवक ३ हजार पोत्यांपर्यंत गेली. रताळ्यास दहा किलोस ५० ते १५० रुपये इतका दर होता. यंदाच्या हंगामातील गुळाच्या आवकेस हळूहळू सुरवात होत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने गुऱ्हाळे सुरू होण्यास विलंब लागत आहे.

बाजार समितीत एक ते दोन दिवसाआड ३ ते ४ हजार गूळ रव्याची आवक होत आहे. किंटलला ३५०० ते ३७००  रुपये इतका दर मिळाला. अजून पंधरा दिवस तरी गुळाची आवक तुटकच राहील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची दररोज एक ते दोन हजार करंड्यांची आवक झाली. त्यांना दहा किलोस ४० ते ८० रुपये इतका दर मिळत आहे. टोमॅटोच्या दरात ही या सप्ताहात चांगलीच वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. टोमॅटोची दररोज दोन ते तीन हजार कॅरेट इतकी आवक होत आहे. जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा परिसरातूनही काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

News Item ID: 
820-news_story-1633956193-awsecm-276
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरु
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

कोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागातून ही आवक झाली. रताळ्याबरोबरच यंदाच्या हंगामातील गुळाच्या आवकेसही बाजार समितीत प्रारंभ झाला. 

बाजार समितीत रताळ्याची आवक साधारणपणे १०० ते २०० पोती इतकी आवक होत असते. पण नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही आवक ३ हजार पोत्यांपर्यंत गेली. रताळ्यास दहा किलोस ५० ते १५० रुपये इतका दर होता. यंदाच्या हंगामातील गुळाच्या आवकेस हळूहळू सुरवात होत आहे. सध्या जिल्ह्यात दररोज परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने गुऱ्हाळे सुरू होण्यास विलंब लागत आहे.

बाजार समितीत एक ते दोन दिवसाआड ३ ते ४ हजार गूळ रव्याची आवक होत आहे. किंटलला ३५०० ते ३७००  रुपये इतका दर मिळाला. अजून पंधरा दिवस तरी गुळाची आवक तुटकच राहील, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्याची दररोज एक ते दोन हजार करंड्यांची आवक झाली. त्यांना दहा किलोस ४० ते ८० रुपये इतका दर मिळत आहे. टोमॅटोच्या दरात ही या सप्ताहात चांगलीच वाढ झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. टोमॅटोची दररोज दोन ते तीन हजार कॅरेट इतकी आवक होत आहे. जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा परिसरातूनही काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

English Headline: 
Agriculture news in marathi, The incoming of jaggery, Ratale started in Kolhapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, बाजार समिती, agriculture Market Committee, नवरात्र, नवरात्री, ऊस, पाऊस, टोमॅटो
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The incoming of jaggery, Ratale started in Kolhapur
Meta Description: 
The incoming of jaggery, Ratale started in Kolhapur कोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागातून ही आवक झाली. रताळ्याबरोबरच यंदाच्या हंगामातील गुळाच्या आवकेसही बाजार समितीत प्रारंभ झाला. 

0 comments:

Post a Comment