नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३२४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,१०० रुपये तर सरासरी दर ३,५५० रुपये मिळाला. सध्या आवक कमी आहे. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
गत सप्ताहात मागणीच्या तुलनेत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सध्या कमी झाल्याचे चित्र आहे.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तेजीमुळे आवकेनुसार दर निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ७,२११ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने दर कमी राहिले. वालपापडीला प्रति क्विंटल २,००० ते ४,००० असा तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रति क्विंटल ३००० ते ४,००० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. वाटाण्याची आवक ७० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल १३,००० ते १,५००० तर सरासरी दर १,४००० रुपये राहिला. गाजराची आवक ३२६४ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,२०० ते ४,००० तर सरासरी दर ३,७०० रुपये राहिला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,१०० तर सरासरी ६००, वांगी ५०० ते ८,०० तर सरासरी ६५० व फ्लॉवर १२५ ते ३५० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ६०० ते ९०० तर सरासरी दर ७५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ४५० तर सरासरी ३५५, कारले १५० ते २५० तर सरासरी २००, गिलके ३५० ते ४५५ तर सरासरी ३५०, दोडका २५० ते ४६० तर सरासरी दर ३२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.
कांद्याची आवक ७,०७२ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ७५० ते ३,००० मिळाला तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५,०४१ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४०० ते १,३५० तर सरासरी दर ७५० रुपये राहिला. लसणाची आवक १०६ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,००० ते ८,५०० तर सरासरी दर ७,००० रुपये राहिला. आद्रकची आवक २४३ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,००० ते ४,५०० तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ७५६ क्विंटल झाली. तिला प्रति क्विंटल ८५० ते १,२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ५,४८० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment