औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कोबी, वांगी, आल्याचे दर स्थिर होते. तर, हिरवी मिरची, भेंडी, लिंबू दरात चढउतार पाहायला मिळाला.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान वांग्यांची ७६ क्विंटल आवक झाली. १३ ते १७ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या वांग्यांना २६०० ते ३१०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. कोबीची ३८९ क्विंटल आवक झाली. ४६ ते १६९ दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कोबीचे सरासरी दर ४०० ते ६५० रुपये राहिले.
आल्याची आठवड्यात केवळ तीन वेळा मिळून २९९ क्विंटल आवक झाली. २२ ते २५२ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या आल्याचे सरासरी दर १००० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.
हिरव्या मिरचीची १९४ क्विंटल आवक झाली. २८ ते ४८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या हिरव्या मिरचीला सरासरी १८५० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. भेंडीची ९१ क्विंटल आवक झाली. १३ ते २८ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या या भेंडीला सरासरी २२५० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.
लिंबूची ६६ क्विंटल आवक झाली. या लिंबूला सरासरी १७५० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. शेवग्याची आवक नगण्यच राहिली. आठवड्यात ४ ते ३० क्विंटल दरम्यान केवळ तीन वेळा मिळून ४२ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी ४२५० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात
आली.

0 comments:
Post a Comment