सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, हिरवी मिरचीला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही पुन्हा तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारीची २ ते ४ क्विंटल, भेंडीची १० ते १५ क्विंटल आणि हिरव्या मिरचीची २० ते ४० क्विंटलपर्यंत रोजची आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून मागणीच्या प्रमाणात त्यांची आवक होत नाही. त्यामुळे दरात तेजी आहे. या फळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच अधिक झाली. गवारीला प्रतिक्विंटलला किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये, भेंडीला किमान ४०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
त्याशिवाय वांगी, बटाटा, टोमॅटोच्या दरातही या सप्ताहात काहीशी सुधारणा झाली. त्यांची आवकही तशी जेमतेमच राहिली. वांग्यांची रोज प्रतिदिन २० ते ३० क्विंटल, बटाट्याची ५०० क्विंटल आणि टोमॅटोची २०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १५०० रुपये, सर्वाधिक ३००० रुपये, बटाट्याला किमान ६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर टोमॅटोला किमान ३०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.
डाळिंब दरातील तेजी टिकून
गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाचे दर तेजीत आहेत. या सप्ताहात पुन्हा डाळिंबाला चांगला उठाव मिळाला. डाळिंबांची आवक रोज केवळ अर्धा ते एक टन अशी जेमतेम राहिली. पण, मागणी राहिल्याने दर तेजीत राहिले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १३००० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment