सध्या बहुतांश ठिकाणी पाऊस थांबलेला आहे. तरीही बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये (उदा. सांगली, नाशिक इ.) अजूनही संध्याकाळी ७ ते सकाळी नऊपर्यंत दव पडत असल्याचे दिसून येते. द्राक्ष कॅनोपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नियंत्रित झालेल्या डाऊनी मिल्ड्यू रोगाचे बिजाणू पुन्हा सक्रिय झालेले आढळून येत आहेत. तसेच ज्या भागामध्ये सिंचन क्षेत्र आहे, किंवा सखल भागामध्ये अशा ठिकाणीही जास्त प्रमाणात दव पडत आहे. आर्द्रतेचे प्रमाण अधिक असून, रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी
स्थानिक बाजारपेठेसाठी व्यवस्थापन करत असलेल्या द्राक्ष बागेमध्ये फवारणीसाठी पुढील बुरशीनाशके वापरता येतील.
- ॲमिसूलब्रुम (१७.५ टक्के एससी) ०.३७५ मिलि प्रति लिटर किंवा
- फ्युयोपिकोलाईड (४.४४ टक्के) अधिक फोसेटिल एएल (६६.६७ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- डायमिथोमॉर्फ (५० टक्के डब्ल्यूपी) ०.५० ते ०.७५ ग्रॅम प्रति लिटर.
निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये पुढील प्रमाणे फवारणी करता येईल.
- पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव फॉस्फरस ४ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- झायरम (२७ टक्के एससी) ३.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा
- मेटीराम (७० डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर.
- रशिया देशांमध्ये निर्यात करणार असलेल्या द्राक्ष पिकांमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव फॉस्फरस आणि फोसेटिल एएल यांचा वापर अजिबात करू नये.
- शेतकऱ्यांनी अधिक दव असलेल्या स्थितीत सलग वेगवेगळ्या बुरशीनाशकांची फवारणी न करता प्रथम वापरलेल्या बुरशीनाशकाच्या परिणामाची साधारणतः दोन ते तीन दिवस वाट पाहून शहानिशा करावी.
- दोन बुरशीनाशकांच्या फवारणीमधील अंतर कमीत कमी तीन दिवसांचे असावे. यामुळे बुरशीनाशकांचा अति व विनाकारण होणारा वापर टाळता येईल.
- या सोबत कॅनोपीमध्ये साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी ब्लोअरचा वापर करावा. त्यामुळे कॅनोपीमधील ओलावा वेगाने कमी होऊन रोगांच्या वाढीस आळा बसेल.
भुरी रोगाचा प्रादुर्भाव
दवाचे प्रमाण कमी असलेल्या व वातावरण कोरडे असलेल्या ठिकाणी अनुकूल वातावरणामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका दिसतो. अशा ठिकाणी भुरी नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे नियोजन करावे.
स्थानिक बाजारपेठेसाठी व्यवस्थापन करत असलेल्या बागांसाठी फवारणी
- सायफ्लुफेनामाईड (५ टक्के इडब्ल्यू) ०.५ मिलि प्रति लिटर किंवा
- सल्फर (४० एससी) ३ मिलि प्रति लिटर किंवा
- टेट्राकोनॅझोल (३.८ टक्के इडब्ल्यू) ०.७५ मिलि प्रति लिटर किंवा
- मेट्राफेनॉन (५० टक्के एससी) ०.२५ मिलि. प्रति लिटर किंवा
- फ्लुक्झापायरॉक्झाईड (७५ ग्रॅम प्रति लिटर) अधिक डायफेनोकोनॅझोल ( ५० ग्रॅम प्रति लिटर) एसएसी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.८ मिलि प्रति लिटर.
- निर्यातक्षम द्राक्षबागांसाठी सल्फर ( ४० एससी) ३ मिलि प्रति लिटर पाणी याचा फवारणीद्वारे वापर करावा. या फॉर्म्युलेशनच्या वापरामुळे द्राक्षमण्यावर सल्फर फवारणीमुळे पडणारे पांढरे डाग कमी राहण्यास मदत होईल.
- बदलत्या वातावरणात सतत वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करण्यापेक्षा जैविक नियंत्रकांचा वापर करावा. ट्रायकोडर्मा २ ते ५ मिलि प्रति लिटर व बॅसीलस सबटिलिस २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे वापर सुरू ठेवावा.
- ॲम्पिलोमायसिस क्विसक्वॅलिस हे भुरी रोगावर एक प्रभावी जैविक नियंत्रक असून, त्याचा पाच मिलि प्रति लिटर या प्रमाणे वापर करावा.
- जैविक नियंत्रक व रासायनिक बुरशीनाशके यांचा एकत्रित वापर (टॅंक मिक्स) करू नये.
- डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६
- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

0 comments:
Post a Comment