Saturday, December 4, 2021

मराठवाड्यात वीस टक्‍केच पीककर्ज पुरवठा

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शेतीसाठी करावयाच्या कर्जपुरवठ्याची गती मंदच असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी केवळ २०.६९ टक्‍केच कर्जपुरवठा झाला होता. त्यामुळे वेळेत कर्जपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण बॅंका किती गंभीरतेने घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जपुरवठा वेळेत वा पूर्वी होण्याची आवश्‍यकता असते. तशी तत्परता शासनस्तरावरून राबविण्याचे बॅंकांना सुचविले जाते. परंतु कागदावरच्या या गोष्टी प्रत्यक्षात उतरताना मात्र दिसत नाहीत. यंदाच्या खरीप हंगामात कर्जपुरवठ्याची लक्ष्यांकपूर्ती करण्याचे काम शेवटपर्यंत सुरू होते. आता रब्बीत कर्जपुरवठ्याची लक्ष्यांकपूर्ती करण्यासाठी बॅंका काय करतात, हे सांगण्यास कर्जपुरवठ्याची गतीच बोलकी आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना रब्बी हंगामासाठी ३३०३ कोटी १३ लाख ९२ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्या तुलनेत २९ नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ६८३ कोटी ३२ लाख ६९ हजार रुपये, अर्थात लक्ष्यांकाच्या केवळ २०.६९ टक्‍केच कर्जपुरवठा करण्यात आला आहे. केवळ ७३ हजार १४४ शेतकऱ्यांना या कर्जाचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात ३२३ कोटी ८३ लाख ४८ हजार रुपयांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत २४.१३ टक्‍के लक्ष्यांकपूर्ती करताना ८११७ शेतकऱ्यांना ७८ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला.

जालना जिल्ह्यात ४७० कोटी ४८ लाख रुपये लक्ष्यांकाच्या तुलनेत २४.८ टक्‍के १०८४७ शेतकऱ्यांना ११३ कोटी २९ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. परभणी जिल्ह्यासाठी ४०६ कोटी ९८ लाख २४ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचा लक्ष्यांक आहे. १० हजार ४८९ शेतकऱ्यांना ९७ कोटी २९ लाख ६४ हजाराचा कर्जपुरवठा करत २३.९१ टक्‍के लक्ष्यांकपूर्ती केली गेली. 

हिंगोली जिल्ह्यात २५२ कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट, तर फक्‍त ७.४९ टक्‍के लक्ष्यांकपूर्ती करत १८ कोटी ८९ लाख ३० हजारांचा कर्जपुरवठा केवळ १९९४ शेतकऱ्यांना करण्यात आला. लातूर जिल्ह्यासाठी ५७७ कोटी २६ लाख रुपये लक्ष्यांकाच्या तुलनेत केवळ ९.३९ टक्‍के, अर्थात ५४ कोटी २३ लाख रुपयांचाच कर्जपुरवठा केला गेला. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ३६० कोटी २० लाख लक्ष्यांकाच्या तुलनेत केवळ ५४०० शेतकऱ्यांना ५७ कोटी २३ लाख रुपये कर्जपुरवठा करत १५.८९ टक्‍के लक्ष्यांकपूर्ती केली गेली.

बीड जिल्ह्यात यंदा ४०० कोटी लक्ष्यांकाच्या तुलनेत १७२ कोटी ६२ लाख रुपयांचा २० हजार १२८ शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत सर्वाधिक ४३.१६ टक्‍के लक्ष्यांकपूर्ती केली गेली आहे. नांदेड जिल्ह्यात ५१२ कोटी २० लाख रुपये लक्ष्यांकाच्या तुलनेत ११ हजार २८९ शेतकऱ्यांना ९१ कोटी ६४ लाख रुपये कर्जपुरवठा झाला. मराठवाड्यासाठी कर्जपुरवठ्याच्या लक्ष्यांकात नोव्हेंबरअखेर जिल्हा बॅंकांनी सर्वांत कमी, तर व्यापारी बॅंकानी सर्वांत जास्त कर्जपुरवठा केला आहे.

News Item ID: 
820-news_story-1638619592-awsecm-434
Mobile Device Headline: 
मराठवाड्यात वीस टक्‍केच पीककर्ज पुरवठा
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Twenty percent peak loan supply in Marathwada
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, शेती, farming, कर्ज, रब्बी हंगाम, खरीप, mate, परभणी, Parbhabi, लातूर, Latur, तूर, उस्मानाबाद, Usmanabad, बीड, Beed, नांदेड, Nanded, व्यापार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Twenty percent peak loan supply in Marathwada
Meta Description: 
Twenty percent peak loan supply in Marathwada औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शेतीसाठी करावयाच्या कर्जपुरवठ्याची गती मंदच असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी केवळ २०.६९ टक्‍केच कर्जपुरवठा झाला होता.

0 comments:

Post a Comment