Wednesday, January 12, 2022

कापूस बाजार मजबूत राहणार

फॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी विभागाची म्हणजे यूएसडीएची सेवा आहे. त्यांचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यानुसार भारतात २०२१-२२ च्या हंगामात कापूस उत्पादन (Cotton Production) घटण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात भारतात १२४ दशलक्ष हेक्टरवर २७७ लाख खंडी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे. एक खंडी म्हणजेच ४८० बुशेल्स कापूस. अवेळी पडलेला पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे (Pink Bollworm) उत्तर भारतात कापसाचे उत्पादन घटले आहे. एका बाजूला उत्पादनात घट अपेक्षित आहे, तर दुसऱ्या बाजूला कापूस वापर मात्र वाढण्याचा अंदाज आहे.  

हेही वाचा - हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडे

यंदा देशात २६० लाख खंडी कापूस वापर होण्याचा अंदाज आहे. तिसरा मुद्दा आहे तो निर्यातीचा. यंदाच्या हंगामात सूत (Yarn) आणि कापड (Cloth) निर्यातीला मोठी मागणी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या कारणांमुळे यंदाच्या हंगामात कापसाला चांगला उठाव आहे. त्यामुळे कापसाचे दर मजबूत राहण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

फॉरेन अॅग्रीकल्चरल सर्व्हिसेसच्या (Foreign Agriculture Services) मते देशात २७७ लाख खंडी कापूस उत्पादन होईल. हे उत्पादन युएसडीएच्या आधीच्या अंदाजापेक्षा तीन लाख गाठींनी कमी आहे. पंजाब आणि हरियानात पाऊस आणि गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादन घटले आहे. व्यापारी सुत्रांच्या मते कापसाची गुणवत्ता घटली असून रंगही बदलला आहे. फॉरेन अॅग्रीकल्चरला सर्व्हिसेसच्या अंदाजानुसार देशातील कापूस उत्पादकता हेक्टरी ४८६ किलो राहण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सुधारले आहेत. 

हेही वाचा - नागपुरात सोयाबीनच्या आवकेत वाढ

सध्या कापसाचे दर हमीभावापेक्षा ५० टक्के अधिक आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते देशातील बाजारांत ३१ डिसेंबरपर्यंत १३४.८ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. एक कापूस गाठ १७० किलो कापसाची असते. देशातील कापूस उत्पादन अंदाजाच्या ३७ टक्के कापूस बाजारात आला आहे. मागील वर्षी याच काळातील कापूस आवक १९ टक्के अधिक होती. मात्र मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही आवक काहीशी जास्त आहे. देशातील कमी उत्पादन आणि शेतकऱ्यांनी माल रोखल्याने बाजारात कमी आवक झाली आहे. देशातील कापूस उत्पादनातील घट चिंताजनक असेल, असे केडिया कॅपिलटलचे अजय केडिया यांनी सांगितले आहे. 

देशातील व्यापार आणि उद्योगाच्या मते कापूस उत्पादन ३२० लाख गाठींच्या दरम्यान राहिल. युएसडीएचा सुधारित अंदाज वेगळा असण्याची शक्यता आहे. उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांनी माल रोखून धरल्याने बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे कापूस दरात वाढ झाली आहे. बाजारात मुलभूत घटक म्हणजेच फंडामेन्टल्स पाहता दर टिकून राहण्याची स्थिती आहे.
- अजय केडिया, संचालक, केडिया ॲडव्हायजरी

देशातील कापूस वापर यंदा २६० लाख खंडी म्हणजेच ३३३ लाख गाठी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच २७७ लाख खंडी उत्पादन आणि वापर २६० लाख खंडी होण्याची शक्यता आहे. तर आयात १० लाख खंडीची होईल. सूत आणि कापड निर्यातीला असलेल्या मागणीमुळे यंदा कापूस वापर वाढणार आहे. यंदा देशातून ५९ लाख खंडी म्हणजेच ७६ लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज आहे. हा अंदाज युएसडीएच्या आधीच्या अंदाजापेक्षा अधिक आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या मते नोव्हेंबरमध्ये देशातून कापसाची निर्यात दीडपट झाली आहे. मात्र यंदाच्या हंगामातील कापसाची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यानी कमी आहे. यंदा लॉजिस्टीकसह वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. तसेच केंद्र सरकराने कापडावरील जीएसटी वाढीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने कापड उद्योगाला दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम मिल्सच्या कार्यक्षमतेवर होत आहे.

थोडक्यात फॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेसच्या अहवालावरून हे स्पष्ट होतंय की देशात यंदा २७७ लाख खंडी कापूस उत्पादन होईल आणि आयात १० लाख खंडी होईल, अशी चिन्हे आहेत. तर देशांतर्गत वापर २६० लाख खंडी राहील. आणि निर्यात ५९ लाख खंडी होईल. याचा सार काय तर देशात पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक राहील. त्यामुळे देशातील कापूस दराला या मागणीचा आधार मिळेल. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी आहे. कापसाला चांगला दर मिळण्यासाठी सगळे घटक अनुकूल आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांनी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आणि बाजारातील किंमतपातळीवर नजर ठेऊन कापूस विक्रीचा निर्णय घेणे योग्य ठरेल, असा जाणकारांचा सल्ला आहे.

News Item ID: 
820-news_story-1641994878-awsecm-712
Mobile Device Headline: 
कापूस बाजार मजबूत राहणार
Appearance Status Tags: 
Mukhya News
Mobile Body: 

English Headline: 
The cotton market will remain strong
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
Search Functional Tags: 
सेस, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, भारत, मात, mate, कापूस, cotton, production, ऊस, पाऊस, गुलाब, Rose, pink bollworm, हळद, agriculture, पंजाब, हरियाना, व्यापार, हमीभाव, Minimum Support Price, वर्षा, Varsha, खून, मंत्रालय
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The cotton market will remain strong, cotton production, cotton export
Meta Description: 
देशातील कापूस वापर यंदा २६० लाख खंडी म्हणजेच ३३३ लाख गाठी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच २७७ लाख खंडी उत्पादन आणि वापर २६० लाख खंडी होण्याची शक्यता आहे. The cotton market will remain strong

0 comments:

Post a Comment