लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५) भाजीपाल्याच्या आवकेवर शुक्रवारी (ता.१४) आलेल्या मकर संक्रांतीच्या सणाचा परिणाम जाणवला. सर्व भाजीपाल्याची मिळून ८७ क्विंटलच आवक झाली. या आवकेत ६ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
लातूर बाजार समितीमध्ये शनिवारी दोडक्याची १ क्विंटल आवक झाली. त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ क्विंटल आवक झालेल्या कोबीचा दर १००० ते १६०० रुपये राहिला. फ्लॉवरची आवक १० क्विंटल झाली. त्यास १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. गावरान टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. त्याचे दर ७०० ते १२०० रुपये, तर सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या वैशाली टोमॅटोला ६०० ते १००० रुपये दर मिळाला.
एक क्विंटल आवक झालेल्या पालकला ६०० ते १००० रुपये दर मिळाला. शेपूची आवक १ क्विंटल झाली. त्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ३ क्विंटल आवक झालेल्या भोपळ्याला सरासरी ८०० रुपये दर मिळाला. ४ क्विंटल आवक झालेल्या कोथिंबिरीचे सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची आवक २ क्विंटल, तर सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ८०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला सरासरी ५०० रुपये दर मिळाला.
४०० जुड्यांची आवक झालेल्या कांदापेंडीला सरासरी ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. काकडीची आवक ११ क्विंटल, तर सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल राहिली.

0 comments:
Post a Comment