Tuesday, January 18, 2022

जालन्यात हिरवी मिरची, गवार, वांग्यांच्या दरात तेजी

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१८) गवार, वांगी व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. दरात मात्र तेजी पाहायला मिळाली. बटाट्यासह पालक, मेथी, शेपू व पुदिनाचे शेकडा दर स्थिर राहिले. तर टोमॅटोचे दर तुलनेने कमी राहिले. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी वांग्यांची १३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल तर सरासरी ६००० रुपये दर मिळाला. गवारीची आवक ४ क्‍विंटल, तर दर ४००० ते ५५०० रुपये, तर सरासरी ५००० रुपये राहिले. हिरव्या मिरचीची आवक २२ क्‍विंटल, तर दर ३००० ते ५५०० रुपये व सरासरी ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

फ्लॉवरची आवक २५ क्‍विंटल, तर सरासरी दर २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ७०० रुपये दर मिळाला. वाटाण्याची आवक १२ क्‍विंटल, तर सरासरी दर २५०० रुपये राहिला. गाजराचे सरासरी दर १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. भेंडीची आवक ७ क्‍विंटल, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. 

दोडक्‍याला सरासरी २००० रुपये 

दहा क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या दोडक्‍यांना सरासरी २००० रुपये दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चोपड्या दोडक्‍याचे सरासरी दर १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी ३००० रुपये दर मिळाला. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १५०० जुड्या, मेथी २००० जुड्या, पालक १००० जुड्या, तर शेपूचीही १००० जुड्यांची आवक झाली. या सर्व पालेभाज्यांना सरासरी १०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.

News Item ID: 
820-news_story-1642511809-awsecm-431
Mobile Device Headline: 
जालन्यात हिरवी मिरची, गवार, वांग्यांच्या दरात तेजी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१८) गवार, वांगी व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. दरात मात्र तेजी पाहायला मिळाली. बटाट्यासह पालक, मेथी, शेपू व पुदिनाचे शेकडा दर स्थिर राहिले. तर टोमॅटोचे दर तुलनेने कमी राहिले. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी वांग्यांची १३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल तर सरासरी ६००० रुपये दर मिळाला. गवारीची आवक ४ क्‍विंटल, तर दर ४००० ते ५५०० रुपये, तर सरासरी ५००० रुपये राहिले. हिरव्या मिरचीची आवक २२ क्‍विंटल, तर दर ३००० ते ५५०० रुपये व सरासरी ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

फ्लॉवरची आवक २५ क्‍विंटल, तर सरासरी दर २४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ७०० रुपये दर मिळाला. वाटाण्याची आवक १२ क्‍विंटल, तर सरासरी दर २५०० रुपये राहिला. गाजराचे सरासरी दर १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. भेंडीची आवक ७ क्‍विंटल, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. 

दोडक्‍याला सरासरी २००० रुपये 

दहा क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या दोडक्‍यांना सरासरी २००० रुपये दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चोपड्या दोडक्‍याचे सरासरी दर १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी ३००० रुपये दर मिळाला. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १५०० जुड्या, मेथी २००० जुड्या, पालक १००० जुड्या, तर शेपूचीही १००० जुड्यांची आवक झाली. या सर्व पालेभाज्यांना सरासरी १०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला.

English Headline: 
Agriculture news in marathi, Burnt green chillies, Guar, eggplant prices rise
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, गवा, मिरची, टोमॅटो, भेंडी, Okra
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Burnt green chillies, Guar, eggplant prices rise
Meta Description: 
Burnt green chillies, Guar, eggplant prices rise जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१८) गवार, वांगी व हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. दरात मात्र तेजी पाहायला मिळाली. बटाट्यासह पालक, मेथी, शेपू व पुदिनाचे शेकडा दर स्थिर राहिले. तर टोमॅटोचे दर तुलनेने कमी राहिले. 

0 comments:

Post a Comment