या दोन वर्षातली एकंदरीत स्थिती पाहिल्यास आपल्या लक्षात आलं असेलचं की, यावर्षी सुद्धा आपल्याला चारा टंचाईचा (Fodder scarcity) सामना करावा लागणार आहे. आता जर आपल्याला कळलच आहे की, चाऱ्याची कमतरता भासणार आहे. तर त्या दृष्टीने व्यवस्थापन केल्यास ही अडचण काही प्रमाणात दूर होऊ शकते. २०२० मध्ये देशांतर्गत कोरड्या आणि हिरव्या चाऱ्याच एकूण उत्पादन अनुक्रमे ४० आणि ५९ कोटी टन इतक होते. याउलट आवश्यकता मात्र ५३ आणि ८८ कोटी टन अनुक्रमे इतकी होती. गरजेच्या तुलनेत २३ टक्के कोरडा (Dry Fodder) आणि ३२ टक्के हिरव्या चाऱ्याचा (Green Fodder) तुटवडा होता. आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढणार... तर सोप्पय... तुमच्याकडे जो हिरवा चारा सध्या उपलब्ध आहे न, त्याचा मुरघास बनवायचा, तो कसा बनवायचा? त्याचे फायदे काय? ते आता पाहूया.
हेही पाहा- https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-silage-making-livestock-24967
उन्हाळ्यात चाऱ्याची किंवा पाण्याची टंचाई असताना जनावरांना फक्त कोरडा चारा देऊन कसं बर चालेल? जनावरांच्या संतुलित आहारात ओली वैरण, सुकी वैरण, पशुखाद्य...सोबतच क्षार मिश्रणे (Mineral mixture) यांचा समावेश असला पाहिजे... होय, असला तर पाहिजे. पण तो खरंच आपण करतो का? नाही न. सततचा दुष्काळ मग तो ओला असो कि कोरडा. चाऱ्याचा प्रश्न गंभीरच. या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे मुरघास. (Silage) ओल्या दुष्काळाने शेतातील पिक कुजत, कोरडा चारा भिजतो. याउलट सुक्या दुष्काळाने चारा उगवायचा कसा हा प्रश्न. जनावरांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक असते. मुरघास खाऊ घातल्यानं... जनावरांना आपण फक्त हिरवा चाराच देत नाही तर. त्यातील पोषण मुल्यांच जतन करून उलट काहीसं वाढवूनच देत असतो. शेतात उभे असलेल्या चाऱ्या पिकांच मुरघास बनवून हिरव्या चाऱ्याची (Fodder) कमतरता (Scarcity) भरून काढू शकतो. असं केल्यानं लागवडीखालील क्षेत्राच्या वापरावर मर्यादा येणार नाहीत. बर एवढं ऐकल्यानंतर मुरघास का? हे स्पष्ट झालं असेलचं.
व्हिडीओ पाहा-
कैरीचं लोणचं माहित असेलचं न. पण हिरव्या चाऱ्याच लोणचं? अहो, मुरघास. चांगल्या प्रतीचा हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना सोबतच पिकात पाण्याचा अंश ६० ते ७० % असताना त्याची कापणी केल्यानंतर त्याची कुट्टी करून कमीतकमी ४५ दिवस हवाबंद अवस्थेत पिशवीत, खड्यात किंवा बांधकामात साठवून ठेवल्यावर जे तयार होतं. ते मुरघास होय. विशेष म्हणजे मुरघास फक्त हिरव्या चाऱ्याचाच होतो. पण जर मुरघास मका (maize) पिकापासून केला. तर तो उत्तम प्रतीचा बनतो. पाण्याची उपलब्धता असेल तेव्हा हिरव्या चाऱ्याच अधिक उत्पादन घेऊन हिरवा चारा जनावरांना वर्षभर खाऊ घालण्यासाठी त्याचा मुरघास बनवून ठेवावा. असं केल्यानं काय होईल. हिरव्या चाऱ्याची बोंब होणारं नाही. आणि आपल्या जनावरांना वर्षभर सकस आहार मिळून दूध उत्पादनात सातत्य राहील.

0 comments:
Post a Comment