सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज १० हजार क्विंटल आवक होत असून, त्यास प्रति क्विंटल ३१०० ते ३८६० सरासरी ३४८० रुपये असा दर मिळत आहे.
बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील आष्टासह अन्य भागातूनदेखील बाजार समितीत गुळाची आवक होत असली, तरी प्रमाण कमी आहे. शिराळा तालुक्यातील गूळ हा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील बाजार समितीत विक्रीस जातो. त्यामुळे सांगली बाजार समितीत त्याची आवक होत नाही. सांगली बाजार समिती ही गुळासाठी देखील प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत कर्नाटकातून गूळ सौद्यास येतो. कर्नाटक राज्यात बारा महिने गुऱ्हाळ घरे सुरू असतात. सध्या या भागात गुऱ्हाळ घरात गूळ निर्मितीची गती आली आहे. त्यामुळे गुळाची आवक वाढली आहे.
सांगलीतील गूळ हा गुजरातसह उत्तर भारतात विक्री होतो. सध्या मकर संक्रातीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे गुळाची खरेदीसाठी व्यापारी पुढे आले आहेत. चिक्की गुळाला ५१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजार समितीत दररोज सरासरी ७ ते १० हजार क्विंटल गुळाची आवक होत आहे. मंगळवारी (ता. ४) गुळाची १०१७२ क्विंटल गुळाची आवक झाली होती. गुळाची मागणी वाढली जाणार असून, गुळाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे.
प्रतिक्रिया
बाजार समितीत कर्नाटकातून गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. बारमाही गुळाचे सौदे होतात. सध्या मकर संक्रांत सणानिमित्त गुळाची आवक वाढली असून, दरही चांगले आहेत. इथला गूळ गुजरातला विक्री होते.
- महेश चव्हाण, सचिव,
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

0 comments:
Post a Comment