नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये लाल कांद्याची आवक १६,५०५ क्विंटल झाली. आवक व मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते २,२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार आवारात लसणाची आवक ६८९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ७,३००, तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९,८११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १,७०० तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. भाजीपाल्याच्या आवकेत चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ८,०१४ क्विंटल झाली.
वालपापडीला प्रतिक्विंटल ५०० ते १४,०० रुपये दर राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १,००० ते २,५०० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला. हिरवी मिरचीची आवक ५३२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ७,५०० ते ९,६०० रुपये दर मिळाला. गाजराची आवक २,०७८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १,२५० तर सरासरी दर १,०५० रुपये राहिला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७० ते ३२५, तर सरासरी २००, वांगी १५० ते ४००, फ्लॉवर ५० ते १२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला ६० ते १४०, तर सरासरी १०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.
ढोबळी मिरचीला ४०० ते ५००, तर सरासरी दर ४५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. फळांमध्ये केळीची आवक ४५० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,२५०, तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ६९३ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते ९,००० तर सरासरी ६,००० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment