विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean rates) - अकोला बाजारात सोयाबीनची आज ४ मार्चला 2980 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6700 रुपये तर कमाल 7370 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 7200 हजार रुपयांवर होता. त्यामुळे आज अकोला बाजारात कालच्या तुलनेत आवकेत घट झाली असून दरही नरमलेत. तर चिखली बाजारात सोयाबीनची 1055 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6500 रुपये होता. तर कमाल भाव 7200 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6850 चा भाव मिळालाय. तसंच NCDEX वरील माहितीप्रमाणे अकोला केंद्रावर FAQ दर्जाच्या सोयाबीनला आज 7,449 रुपयांचा भाव मिळालाय. तर त्याचबरोबर नागपूर केंद्रावर 7,398 रुपयांचा दर मिळाल्याचं NCDEX च्या वेबसाईटवरून कळतं.
मराठवाडा सोयाबीन बाजारभाव (Marathwada soybean rates) - आज ४ मार्चला लातूर बाजारात 15003 क्विंटल सोयाबीन आलं होतं. या मालाचे भाव किमान 7200 रुपये ते कमाल 7500 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7380 रुपयांनी झालेत. त्यामुळे लातूर बाजारात कालच्या तुलनेत आवक आणि सर्वसाधारण भाव, दोन्ही घटलेत. सर्वसाधारण भावात 40 रुपयांनी तुटलेत. त्याआधी इथं सोयाबीनमध्ये ४०० रुपयांची वाढ झाली होती. तिकडे औराद शहाजनी बाजारात फक्त 378 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 7250 तर कमाल 7350 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7300 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे तुळजापूर बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6850 रुपये तर कमाल 7200 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 7100 होता.
राज्यातील कापूस बाजारभाव (cotton daily rates) - आज हिंगणघाट बाजारात कापसाची 5302 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 7000 तर कमाल 10340 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 8670 चा होता. त्यानंतर सावनेर बाजारात कापसाची 3100 क्विंटल आवक झाली. या मालाला कमीत कमी 9700 तर जास्तीत जास्त 9800 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 9750 चा होता. तसंच आर्वी बाजारात आलेल्या 832 क्विंटल कापसाला 9500 ते 10200 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 9800 रुपये होता. त्यामुळे राज्यात आज कापसाचे सर्वसाधारण दर काही प्रमाणात नरमल्याचं चित्र दिसलं.

0 comments:
Post a Comment