1. येत्या ७ तारखेला पालघर, ठाणे, आणि नगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता (Thundershower) हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलीय. सध्या राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून गेल्या तीन दिवसांपासून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळचं हवामान ढगाळ राहतंय (cloudy weather). ८ तारखेला पावसाची व्याप्ती वाढून तो कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे. ८ तारखेला राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासहित वादळी वारे (gusty winds) आणि विजांचा कडकडाट (lightning) होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं वर्तवलीय.
Thundershower/rainfall activity expected over parts of Maharashtra from 7th of March.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/rWLmZM0X8p— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 5, 2022
2. राज्यातील खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी ग्राहकांसाठी असलेल्या दुधाचे विक्रीदर (milk mrp) वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही स्थिती शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दुधाच्या खरेदीदरातील पुढील वाढीसाठी पोषक ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशात ‘अमूल’ने सर्वात आधी विक्री दरात वाढ केली. ‘अमूल’ने वितरकांचे कमिशन १.७५ ते २.३५ रुपये वाढवले. त्यासाठी म्हशीच्या दुधाचे विक्रीदर लिटरमागं ५९ वरून ६१ रुपयांवर आणले. तसंच गायीच्या दुधाचे विक्रीदर २ रुपयांनी वाढवले. परिणामी, राज्यातल्या इतर दूध प्रकल्पांनीही विक्री दरात वाढ करण्यास सुरुवात केलीये.
3. राज्यात खोलवर रुजलेल्या सहकार चळवळीला अधिक बळकटी आणि गतिमान प्रशासनासाठी सहकार आयुक्तालयासह पुणे शहरातील विविध २३ कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. यासाठी साखर संकुलाच्या धर्तीवर सहकार संकुलांची उभारणी येरवडा येथे होणार आहे. या संकुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजित १०८ कोटी रुपयांपैकी ९४ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.
4. येत्या २१ मार्चला एनसीडिईएक्सवर (NCDEX) शुद्ध एरंडी तेलाचे वायदे सुरू करणार आहेत. यात दोन टनांचं एक युनिट असेल, त्यानुसार ट्रेडिंग करता येईल, असं एनसीडिईएक्सनं म्हटलंय. तर कमाल २०० टनांची ऑर्डर साईज असणार आहे. हे करार रोख रक्कम देऊन पूर्ण करता येणार आहेत.
5. राज्यातल्या बहुतांश बाजारांमध्ये कापसाची भावपातळी ₹१०००० च्या खाली आलीय. राज्यातली कापसासाठी महत्त्वाच्या हिंगणघाट बाजार समितीत (APMC) गेल्या आठवडाभराच्या काळात कापसाची २४,८९४ क्विंटल आवक झालीय. या मालाचे सर्वसाधारण व्यवहार दर्जाप्रमाणे ८३२० ते ८७२० रुपयांच्या घरात राहील्याचं राज्य पणन महामंडळाच्या माहितीवरून कळतं. शेजारच्या पुलगाव बाजारात आठवडाभरात ११६५० क्विंटल कापसाची आवक झाली. या कापसाचे सर्वसाधारण भाव ९४०० ते ९५०० च्या घरात राहीले. दुसरीकडे पारशिवनी बाजारात आठवडाभरात आलेल्या ३५५३ क्विंटल मालालाही ९५०० ते ९८०० च्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळालाय. गेल्या आठवडाभरात उमरेड, सिंदी, किल्ले धारुर, घनसावंगी, मानवत, परभणी, आणि चिमूर हे बाजार वगळता कुठंही सर्वसाधारण भाव १०००० रुपयांच्या पार गेले नाहीत. त्यामुळे कापसाच्या प्रमुख बाजारांमध्ये काही प्रमाणात नरमाई आल्याचं या आठवड्यात दिसलं.

0 comments:
Post a Comment