सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम झाली; पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १५ ते २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल आणि वांग्याची ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे; पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.
गवारला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय ढोबळी मिरची, काकडी, गाजराचे दरही बाजारात टिकून राहिले.
ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर गाजराला किमान ८०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरातही काहीशी घसरण झाली. कांद्याची प्रत्येकी ३० ते ५० गाड्या आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला.
भाज्याही टिकून
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, शेपू, चुका, कोथिंबीर या भाज्यांची आवक जेमतेम झाली. प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत त्यांची आवक होती. स्थानिक भागातूनच ही सगळी आवक झाली. पण या सप्ताहात भाज्यांना फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ४५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये आणि चुक्याला ३०० ते २५० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment