Monday, August 27, 2018

कळमणा बाजार समितीत भुईमुगाची आवक वाढली

नागपूर ः येथील कळमणा बाजारात भुईमूग शेंगाची सरासरी १०० क्‍विंटल आवक असून, ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल असलेल्या भुईमुगाचे दर या आठवड्यात ४००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. हे दर ४००० रुपये क्‍विंटलवर स्थिर राहतील, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कळमणा बाजार समितीत भुईमूग शेंगाची नियमित आवक आहे. सरासरी १०० क्‍विंटल आवक असल्याचे सांगण्यात आले. भुईमूग शेंगाचे दर ४००० ते ४५०० क्‍विंटलवर आहेत. सोयाबीनची आवक ३५० क्‍विंटलची आहे. ३१०० ते ३४०० रुपये क्‍विंटल सोयाबीनचे दर होते. ३०७५ ते ३२५१ रुपये क्‍विंटलवर आता सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत. तुरीचे व्यवहार ३२५० ते ३७५१ रुपये क्‍विंटलने होत असून तुरीची रोजची सरासरी आवक १०० ते १४० क्‍विंटलची आहे. तुरीच्या दरात या आठवड्यात तेजी नोंदविण्यात आली. ३४०० ते ३७५० रुपये क्‍विंटलवर हे दर पोचल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हरभऱ्याच्या ३५०० ते ४२२६ रुपये क्‍विंटलने व्यवहार होत असलेल्या दरात काहीशी तेजी नोंदविण्यात आली. ३६०० ते ४०२६ रुपये क्‍विंटलवर हे दर पोचले. लुचाई तांदळाचे व्यवहार २२०० ते २५०० रुपयांवर स्थिर आहेत. लुचई तांदळाची आवक १०० क्‍विंटलची आहे. मोसंबीची आवक नियमित असून, मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाला १५०० ते २१०० रुपये क्‍विंटलचा दर आहे.

लहान आकाराच्या मोसंबी फळाचे व्यवहार ८०० ते १००० रुपये क्‍विंटलने तर मध्यम आकाराच्या फळाचे व्यवहार १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलने होत आहे. केळीचे व्यवहार ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलने होत असून, केळीची आवक सरासरी १५० क्‍विंटलची आहे. १५०० ते ५००० रुपये क्‍विंटलने डाळिंबाचे व्यवहार होत आहेत. डाळिंबाचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

डाळिंबाची आवक १४०० क्‍विंटलच्या घरात आहे. बटाट्याचे व्यवहार १२०० ते १६०० रुपये क्‍विंटलने होत असून, आवक ३५०० क्‍विंटलची आहे. लाल कांद्याचे दरात घसरण नोंदविण्यात आली. २००० ते २८०० रुपये क्‍विंटल असलेले कांद्याचे दर ८०० ते १२०० रुपयांपर्यंत घसरले. लाल कांद्याची आवक १००० क्‍विंटल असल्याचे सांगण्यात आले. पांढरा कांदा ८०० ते २५०० रुपये क्‍विंटल होता. या कांद्याच्या दरातही घसरण होत ७०० ते १००० रुपये क्‍विंटलवर ते पोचले. पांढऱ्या कांद्याची रोजची आवकदेखील १००० क्‍विंटलपर्यंत आहे.

News Item ID: 
18-news_story-1535379271
Mobile Device Headline: 
कळमणा बाजार समितीत भुईमुगाची आवक वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, kalmana market in ground nuts grew inward
Author Type: 
Internal Author
विनोद इंगोले
Search Functional Tags: 
भुईमूग, Groundnut, व्यापार, बाजार समिती, agriculture Market Committee, मोसंबी, Sweet lime, केळी, Banana, डाळ, डाळिंब
Twitter Publish: 
Publish on Facebook: 

0 comments:

Post a Comment