नगर ः नगर बाजार समितीत मुगाची आवक वाढली आहे. गेल्या सप्ताहात १२२३ क्विंटल मुगाची आवक झाली असून, ५०९० ते ६१३० रुपये दर मिळत आहे. भुसारमध्ये अन्य मालाची आणि भाजीपाल्याची आवक स्थिर आहे. फळांत पपई, मोसबी, डाळिंब, पेरूची आवक होत आहे.
नगर जिल्ह्यामध्ये मुगाचे बऱ्यापैकी पीक घेतले जाते. शेजारच्या बीड, सोलापूर, नाशिक व औरंगाबादच्या काही भागातही मुगाचे पीक घेतले जाते. त्यामुळे नगर बाजार समितीत मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत मुगाची आवक वाढली आहे. नगरला भुसारमध्ये ज्वारीची ११२ क्विंटलची आवक होऊन १६०० ते १८५० रुपये दर मिळत आहे.
बाजरीची ३९ क्लिटंलची आवक होऊन १३४१ ते १४०० रुपये दर मिळाला. तुरीची २१ क्विंटलची आवक झाली आणि तुरीला ३०५१ ते ३४०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची १३८ क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ३८०० रुपये दर मिळाला. गव्हाची २२८ क्विंटलची आवक होऊन गव्हाला १९५० ते २१५० रुपये दर मिळाला. गूळडागाची २०३८ क्विंटलची आवक झाली. गुळाला २६५१ ते ३४७५ रुपये दर मिळाला.
नगरला फळांचीही चांगली आवक होत आहे. गत सप्ताहात मोसंबीची २४० क्विंटलची आवक झाली. मोसंबीला प्रतिकिलो २० रुपये ते ४५ रुपये दर मिळाला. पपईची ५० क्विंटलची आवक झाली. पपईला प्रतिकिलो दहा रुपये ते वीस रुपये दर मिळाला. अननसाची ७८५ क्विंटलची आवक होऊन दहा ते तीस रुपये दर मिळाला. सीताफळाची आवक सुरू झाली असून, आठवडाभरात ३१ क्विंटलची आवक झाली.
सीताफळाला १० ते ३० रुपये प्रतिकिलोला दर मिळाला. पेरूची ३६ क्विंटलची आवक होऊन प्रतिकिलो दहा ते तीस रुपये दर मिळत आहेत. भाजीपाल्यात मेथी, पालक, कोबी, फ्लाॅवर, टोमॅटो, बटाटे, वांगी, शेवगा, हिरवी, मिरची, ढोबळी मिरची, पालक, कोथिंबीर, गवार, भेंडीची आवक चांगली आहे. भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

0 comments:
Post a Comment