यावर्षी अगदी सुरवातीपासून कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. अळी नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनेमध्ये कामगंध सापळ्यांच्या (फेरोमोन ट्रॅप) वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, कामगंध सापळ्यांचा वापर करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
कामगंध सापळ्यांचा उपयोग सर्वेक्षणासाठी आणि पतंग पकडण्यासाठीही होतो. यातून कीटकनाशक फवारणीचे नियोजन व अळ्यांच्या पुढील पिढ्यांची वाढ रोखणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. शेतांमध्ये अळीचा प्रादुर्भाव असून व प्रौढ पतंग आजूबाजूला आढळत असतानाही सापळ्यांमध्ये पतंग अडकत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. नियंत्रणासाठी एकरी ७ ते ८ सापळे वापरण्याची शिफारस असून, त्यासाठी होणारा खर्च लक्षणीय आहे. अशावेळी त्यामधील कामगंध किंवा ल्युरच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
कामगंध सापळे व ल्युरबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या
- पिकांवर प्रादूर्भाव असून व आजूबाजूला पतंगांची संख्या लक्षणीय असूनही सापळ्यांमध्ये पतंग न अडकणे.
- गुलाबी बोंड अळीऐवजी अन्य दुसऱ्या किडीचा ल्युर वापरणे. ल्युरमध्ये लिंग प्रलोभन रसायनाचा अभाव. वापरण्याची अखेरची तारीख संपलेल्या ल्यूरचा वापर. सापळ्यांची व ल्युरची उपलब्धता नसणे.कामगंध सापळ्यांच्या वापराविषयी (उंची, वेळ) नेमकी माहिती नसणे. सापळ्यांमध्ये सुरवातीचे ८ ते १० दिवस पतंग सापडतात, नंतर सापडत नाहीत.
- सापळ्यांचा वापर प्रभावी उपाय असला तरी अशा समस्यांमुळे तंत्रज्ञानाविषयी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
कामगंध सापळे वापराचे फायदे
- सापळ्याद्वारे किडींचे सर्वेक्षण करता येते. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन करता येते. फवारणीच्या खर्चात बचत होते.
- परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहतात.
- गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी पाते-फुले लागण्याच्या अवस्थेपासून फेरोमोन (कामगंध) सापळ्यांचा उपयोग करावा. अंडी अवस्था, अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर व्यवस्थापन करणे कठीण होते.
नुकसानीचा प्रकार
अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारिक कणाच्या साह्याने छिद्र बंद करते. बोंडाच्या निरीक्षणात अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. किडलेल्या पात्या गळून पडतात. अशी बोंडे परिपक्व न होताच फुटतात. गुलाबी बोंड अळी सरकीचेही नुकसान करते. बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होते.
सापळ्यांचा वापर करण्याची पद्धती
- आर्थिक नुकसानीची पातळी समजण्यासाठी ः प्रतिएकर २ ते ३ सापळे (फनेल ट्रॅप).
- नियंत्रणाच्या उद्देशाने ः
एकरी ७ - ८ कामगंध सापळे.
दोन्ही उद्देशासाठी पिकाच्या उंचीपेक्षा १ फूट उंचीवर लावावेत. - सापळ्यामध्ये गुलाबी बोंड अळीचा कामगंध वापरावा. पाकिटावर नमूद केलेल्या कालावधीनंतर ल्यूर बदलावा.
- ३) ल्युर हाताळताना घ्यावी काळजी
- सापळ्यामध्ये कामगंध लावताना ल्यूरचे पाकीट काळजीपूर्वक उघडावे.
- ल्यूर कमीत कमी हाताळावा. शक्यतो हातमोजे वापरावेत किंवा स्वच्छ धुतलेल्या हातांचा वापर करावा.
- ल्यूरची गोळी सापळ्यामधील जागेमध्ये व्यवस्थित बसवावी. सापळे लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. वापरून झालेल्या गोळ्या काळजीपूर्वक जाळून किंवा जमिनीत गाडून त्यांची विल्हेवाट लावावी.
संपकर् ः डॉ. सतीश भोंडे, ९८२२६५०६६१
(निवृत्त शास्त्रज्ञ व अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फळबाग संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, नाशिक)

0 comments:
Post a Comment