Wednesday, August 8, 2018

चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला निर्यात

चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची निर्यात रशियामध्ये करण्यात येत आहे. चीनमधील पांझ्हिहुआ परिसरामध्ये या आंब्याची लागवड असून, येथील अतिउंच भागामध्ये हिवाळा नसल्याने नैसर्गिक हरितगृहाप्रमाणे स्थितीत त्याची वाढ होते. उत्तम दर्जा आणि चवीमुळे त्याला जगभरातील अनेक ठिकाणांहून मागणी आहे.

पांझ्हिहुआ आंबा अन्य प्रदेशांच्या तुलनेमध्ये एक ते दोन महिने उशिरा म्हणजेच ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात बाजारात येतो. तर आग्नेय आशियातील देशांच्या तुलनेमध्ये २ ते ५ महिने नंतर हा आंबा बाजारात येतो. परिणामी, या काळात देशासह परदेशामध्ये चांगली मागणी असते. या आंब्याच्या निर्यातीतील महत्त्वाची कंपनी शांघाय क्विनवेई इंटरनॅशनल ट्रेडिंग लि. येथील आयरीन यांनी सांगितले, की जुलै महिन्यामध्ये पांझ्हिहुआ आंबा उत्पादनाची पहिली २० टनांची बॅच नुकतीच बाहेर पडली. त्याच्या सर्व चाचण्या पार पडल्या असून, त्याची निर्यात कोणत्याही मध्यस्थाविना सरळ रशियाला करण्यात आली. कंपनीच्या एलव्ही क्विंग या ब्रँडखाली बेलारूस, कझाकस्तान, उझबेकिस्तान या देशामध्ये विविध ताज्या भाज्या, फळे व वाळविलेली फळे निर्यात केली जातात.

सुपर मार्केटलाही सरळ निर्यात
पूर्वीपासून रशिया आणि हाँगकाँग येथील पांझ्हिहुआची निर्यात होत आली आहे. त्यात यावर्षी प्रथम व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटची भर पडली. व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटच्या सर्व चाचण्या आणि कडक निकषाची पूर्तता करत पांझ्हिहुआ आंब्याची पहिली शिपमेंट पाठविण्यात आली.

News Item ID: 
18-news_story-1533728889
Mobile Device Headline: 
चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला निर्यात
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची निर्यात रशियामध्ये करण्यात येत आहे. चीनमधील पांझ्हिहुआ परिसरामध्ये या आंब्याची लागवड असून, येथील अतिउंच भागामध्ये हिवाळा नसल्याने नैसर्गिक हरितगृहाप्रमाणे स्थितीत त्याची वाढ होते. उत्तम दर्जा आणि चवीमुळे त्याला जगभरातील अनेक ठिकाणांहून मागणी आहे.

पांझ्हिहुआ आंबा अन्य प्रदेशांच्या तुलनेमध्ये एक ते दोन महिने उशिरा म्हणजेच ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात बाजारात येतो. तर आग्नेय आशियातील देशांच्या तुलनेमध्ये २ ते ५ महिने नंतर हा आंबा बाजारात येतो. परिणामी, या काळात देशासह परदेशामध्ये चांगली मागणी असते. या आंब्याच्या निर्यातीतील महत्त्वाची कंपनी शांघाय क्विनवेई इंटरनॅशनल ट्रेडिंग लि. येथील आयरीन यांनी सांगितले, की जुलै महिन्यामध्ये पांझ्हिहुआ आंबा उत्पादनाची पहिली २० टनांची बॅच नुकतीच बाहेर पडली. त्याच्या सर्व चाचण्या पार पडल्या असून, त्याची निर्यात कोणत्याही मध्यस्थाविना सरळ रशियाला करण्यात आली. कंपनीच्या एलव्ही क्विंग या ब्रँडखाली बेलारूस, कझाकस्तान, उझबेकिस्तान या देशामध्ये विविध ताज्या भाज्या, फळे व वाळविलेली फळे निर्यात केली जातात.

सुपर मार्केटलाही सरळ निर्यात
पूर्वीपासून रशिया आणि हाँगकाँग येथील पांझ्हिहुआची निर्यात होत आली आहे. त्यात यावर्षी प्रथम व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटची भर पडली. व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटच्या सर्व चाचण्या आणि कडक निकषाची पूर्तता करत पांझ्हिहुआ आंब्याची पहिली शिपमेंट पाठविण्यात आली.

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, first batch of Panzhihua Mango has been exported to Russia
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
उझबेकिस्तान, रशिया, ठिकाणे, चीन


0 comments:

Post a Comment