केंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला (नाफेड) हरभऱ्याचा साठा विक्रीस काढण्याची सूचना केली आहे.
देशात गेल्या काही दिवसांत हरभऱ्याच्या दरात वाढ होऊन ते किमान आधारभूत किमतीच्या पातळीला पोहोचले आहेत. त्यामुळे ही संधी साधून नाफेडने आपल्याकडील हरभऱ्याचा साठा विक्रीस काढावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, उडदाच्या बाबतीत मात्र लगेचच साठा विक्रीला काढण्याची घाई करू नये, असे अन्न मंत्रालयाने सांगितले आहे. देशात गेल्या वर्षी या कालावधीचा विचार करता यंदा उडदाच्या लागवडीत काहीशी घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उडीदविक्रीबाबत सध्या `थांबा आणि वाट पाहा` असे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

0 comments:
Post a Comment