कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये (विशेषतः पिकांसोबत आच्छादन पिकांची लागवड, चराई, कडधान्यांची लागवड असे) योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील कृषी क्षेत्र आणि चराऊ कुरणे यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन अडवला जाईल. त्यामुळे जागतिक तापमानामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने घट होऊ शकते, असे कॅलिफोर्निया- बर्केले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.
वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात कार्बन हा मातीमध्ये साठवणे शक्य आहे. सध्या विविध कारणांमुळे उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्याचे निकष व लक्ष्य विविध देशांतील प्रतिनिधींनी निर्माण झालेली इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (आयपीसीसी) ठरवत असते. आयपीसीसीने आतापासून २१०० या वर्षापर्यंत एक अंशाने घट करण्याच्या निर्धािरत केले आहे. जमिनीच्या व्यवस्थापनातून जागतिक तापमानामध्ये किमान ०.१ अंश सेल्सिअसने घट करण्याचा उद्देश अभ्यासाच्या सुरवातीला ठेवण्यात आला होता. हे प्रमाण आयपीसीसीच्या एक अंशाने घट करण्याच्या निर्धारित लक्ष्याचा दहावा हिस्सा आहे. जेव्हा कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाने एकापेक्षा अधिक गोष्टीचा एकत्रित विचार केल्यानंतर कृषी व्यवस्थापनातील बदलामुळे जागतिक तापमानामध्ये ०.२६ अंश सेल्सिअसने घट शक्य असल्याचे लक्षात आले. त्याविषयी माहिती देताना पर्यावरणशास्त्र, धोरण आणि व्यवस्थापन विषयाच्या प्रा. व्हेंडी सिल्व्हर यांनी सांगितले, की केवळ मातीच्या व्यवस्थापनातून जागतिक तापमानामध्ये फरक पडू शकेल का, असा सामान्य प्रश्न अनेकांप्रमाणेच माझ्याही मनात होता. मात्र, आम्ही जेव्हा मातीच्या व्यवस्थापनामध्ये जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात केलेल्या बदलांचा विचार केला, तेव्हा त्याचा परिणाम स्पष्ट झाला. हे साध्य करण्याजोगे असल्याचा विश्वासही त्यातून निर्माण झाला.
कोळसा किंवा पिकांचे अवशेष ऑक्सिजनरहित वातावरणामध्ये जाळून त्यापासून तयार केलेले बायोचार हे जमिनीमध्ये मिसळण्याची विवादास्पद पद्धत पर्यावरणासाठी योग्य ठरत नाही. त्यातून सामान्य तापमानवाढीच्या तुलनेमध्ये ०.४६ अंश सेल्सिअसने अधिक वाढ होत असल्याचे दिसून आले. प्रा. व्हेंडी सिल्व्हर, अॅलेग्रा मायर व सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘ऑनलाइन जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले.

0 comments:
Post a Comment