रूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज ड्रायरची किंमत सुमारे ५ पट जास्त असल्यामुळे लघू उद्योगात या पद्धतीच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. पण उत्तम, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण वाळवण्यासाठी फ्रिज ड्रायिंग एक चांगला पर्याय आहे.
वाळवून अन्नपदार्थ टिकवण्याची पद्धत फार पूर्वीपासूनच वापरली जाते. सर्वच अन्नपदार्थात पाण्याचे प्रमाण असते. पाणी हे सूक्ष्म जिवांच्या वाढीसाठी उत्तम माध्यम आहे, म्हणून अन्नपदार्थ खराब किंवा नाश पावतात. वाळवण्याचा प्रक्रियेत अन्नातील पाणी काढून घेतले जाते. परिणामतः सूक्ष्म जीव वाढीसाठी योग्य किंवा अनुकूल माध्यम नसल्यामुळे अन्नपदार्थ टिकतात. वाळवण्यासाठी उन्हात पसरवून ठेवण्याची पद्धत पारंपरिक आहे. या पद्धतीत धूळ, अनियंत्रित तापमान, वातावरण वरील अवलंबित्व इत्यादी घटकांची मर्यादा आल्यामुळे ही घरगुती पातळीवर वापरली जाते.
इतर ड्रायर्सचे तोटे
सोलर ड्रायर, ट्रे ड्रायर, ड्रम ड्रायर, रोटरी ड्रायर, स्प्रे ड्रायर, टनेल ड्रायर इत्यादी यांत्रिक स्वरूपाचे ड्रायर वापरून अन्नपदार्थ वाळवले जातात. या यांत्रिक ड्रायर्समुळे तापमान नियंत्रित करणे, धुळीपासून संरक्षण आणि एकसारखे वाळवणे शक्य झाले. पण या यांत्रिक ड्रायर्समुळे वाळवलेल्या अन्नपदार्थातील रंग, गंध, पोषण मूल्याचा नाश होतो.
फ्रिज ड्रायिंगची कार्यपद्धती
आधुनिक आणि वापरास सोयीची फ्रिज ड्रायिंग ही पद्धत नावीन्यपूर्ण आहे. फ्रिज ड्रायिंग शब्दशः असे वाटते की फ्रिज किंवा शीतपेटीत ठेवून वाळवले जाते का? तर या वाळवण्याच्या प्रक्रियेत आधी अन्नपदार्थ शून्य अंशापेक्षा कमी तापमानाला आणले जाते, या तापमानाला आल्यावर अन्नातील सर्व पाण्याचे बर्फात रूपांतर होते, या तापमानाला आणल्यावर अन्नपदार्थावरील दाब (प्रेशर) हे ४.५८ एम एम एच जी (mmHg) इतका नियंत्रित ठेवला जातो. या दाब आणि तापमानाच्या परिस्थितीला बर्फाचे रूपांतर सरळ बाष्पात होते. घन स्वरूपातील बर्फ द्रव स्वरूपात न जाता बाष्पात रूपांतरित होण्याच्या क्रियेला शब्लिमेशन म्हणतात. शब्लिमेशनमुळे सुमारे ८० टक्के पाण्याचे बर्फातून बाष्पात रूपांतर होते. त्या नंतर हळूहळू तापमान वाढवून जास्तीत जास्त ४० अंश इतके करून उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन केले जाते आणि अशा पद्धतीने कमी तापमानाला पदार्थ वाळवला जातो.
फ्रिज ड्रायिंगचे फायदे
- कमी तापमानाला प्रक्रिया होत असल्यामुळे हाताळण्यास सोपी आहे.
- वाळवलेल्या अन्नपदार्थांचे आकारमान सुयोग्य राहते (आकुंचन होत नाही).
- कमी तापमानामुळे पदार्थाचा रंग टिकून राहतो.
- पदार्थातील नैसर्गिक गंध टिकून राहण्यास कमी तापमानातील प्रक्रिया मदत करते.
- वाळवल्यानंतर पुन्हा पाणी शोषून घेण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याची क्षमता या फ्रिज ड्राय केलेल्या पदार्थांना असते.
- अन्नातील पोषक घटक सुरक्षित राहतात.
- अन्नातील बायो-ॲक्टिव घटकांचे संवर्धन होते.
- ज्या पदार्थांना रंग, गंध, बायो-ॲक्टिव घटकांमुळे बाजारभाव मिळतो, उदा : स्ट्रॉबेरी, लाल मिरची, बहुमूल्य मसाल्याचे पदार्थ इ. पदार्थांचे फ्रिज ड्रायिंग करून टिकवणं सहज शक्य आहे.
संपर्क ः प्रा. एस. बी. पालवे, ८२७५४५२२०३
(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

0 comments:
Post a Comment