हंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात. काढणीनंतर ही फळे जास्तीत जास्त दोन ते चार दिवसच टिकत असल्याने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्यामुळे मिळेल त्या दराने विकावी लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. या फळांपासून जॅम बनवून मूल्यवर्धन करता येते अाणि चांगला फायदा मिळवता येतो.
अननस
- अननसाच्या फळांची साल काढून गराचे तुकडे करावेत.
- तुकडे केलेला गर मिक्सरमधून बारीक करून शिजण्यासाठी गॅसवर ठेवावा.
- एक किलो अननसाच्या गरामध्ये ७५० ग्रॅम साखर मिसळून गर सतत ढवळत राहावा.
- पहिली उकळी आल्यानंतर ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
- - गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा टीएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे.
- ब्रिक्स ६८ टक्के व १०२ अंश सेल्सिअस तापमान येईपर्यंत जॅम शिजू द्यावा.
- जामची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी. सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल.
- तयार जॅममध्ये इसेेन्स व खाण्याचा रंग मिसळून गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.
उंबर
- उंबराची फळे स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी.
- फळे मिक्सरमधून बारीक करून गर तयार करावा.
- गर शिजण्यासाठी ठेवावा. एक किलो गरामध्ये ७५० ग्रॅम साखर अाणि ६ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
- गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा टीएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे.
- ब्रिक्स ६८ टक्के व १०२ अंश सेल्सिअस तापमान येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी.
- सर्व टेस्ट योग्य आल्यानंतर जॅम तयार होईल.
- शेवटी तयार झालेल्या जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेेन्स व खाण्याचा रंग मिसळावा. गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.
चिकू
- २०० ग्रॅम चिकूच्या गरामध्ये २०० ग्रॅम साखर मिसळून गर गॅसवर ठेवावा.
- पहिल्या उकळीनंतर २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
- गर घट्ट होत आल्यानंतर टीएसएस (ब्रिक्स) व तापमान मोजावे.

- तयार जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग मिसळावा. गरम जॅम बॉटलमध्ये भरावा.
पपई
- पक्व पपई स्वच्छ धुऊन साल काढावी. गराचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये एकजीव करावा.
- गर पातेल्यामध्ये घेऊन गॅसवर ठेवावा. त्यामध्ये ७५० ग्रॅम साखर मिसळावी.
- पहिल्या उकळीनंतर ६ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.

जांभूळ
- ५०० ग्रॅम फळे धुऊन घ्यावीत व ती ब्लॅचिंग करून घ्यावी. (३ ते ४ मिनिटे)
- ब्लॅचिंग केलेल्या सर्व फळांची साल काढून हाताने कुस्करून त्याच्या बिया वेगळ्या करून घ्याव्यात.
- गर मिक्सरमधून एकजीव करून गॅसवर ठेवावा.
- गर शिजत असताना ४०० ग्रॅम साखर मिसळावी.
- पहिल्या उकळीनंतर २.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.

- ब्रिक्स ६८ टक्के व तापमान १०२ अंश येईपर्यंत जाम शिजू द्यावा. नंतर जामची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी.
मिक्स फ्रूट जॅम
- फळे ः पपई १.५ किलो, केळी १.५ किल, अननस १ किलो, सफरचंद ५०० ग्रॅम, पेरू १ किलो, संत्रा ५०० ग्रॅम, द्राक्ष ५ किलो ग्रॅम.
- सर्व फळांपासून मिळालेला एकूण गर ४ किलो ५०० ग्रॅम
- साखर ६ किलो ३०० ग्रॅम
- सायट्रिक ॲसिड २७ ग्रॅम
- पेक्टीन पावडर ७० ग्रॅम
- सोडियम बेंझोएट २ ग्रॅम
- सर्व फळांचा एकजीव केलेला गर गॅसवर ठेवावा.
- गर शिजत असताना त्यामध्ये अर्धी साखर मिसळावी. १५ मिनिटांनी अर्धी साखर पेक्टीनमध्ये मिसळून टाकावी. सोबतच सायचट्रीक ॲसिडसुद्धा मिसळावे.

- ब्रिक्स हा ६८ टक्के व १०२ अंश सेल्सिअस तापमान येईपर्यंत जॅम शिजू द्यावा. जॅमची प्लेट टेस्ट व ड्रॉप टेस्ट घ्यावी.
- सर्व टेस्ट योग्य आल्यांतर जॅम तयार होईल.
- तयार झालेल्या जॅममध्ये आवश्यकता असल्यास इसेन्स व खाण्याचा रंग मिसळावा व गरम जाम बॉटलमध्ये भरावा.
संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

0 comments:
Post a Comment