Tuesday, October 9, 2018

सुधारित अवजारे करतात कष्ट कमी

वैभव विळा :
१) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत करता येते.
२) दातेरी पत्यामुळे या विळ्याला धार लावायची गरज नाही.
३) वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असून समतोल साधून सहज कापणी होते.
४) एका तासामध्ये २ गुंठ्याची कापणी करता येते.

भेंडी तोडणी कात्री :
१) भेंडीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळहात आणि बोटांना त्यामुळे इजा होते.
२) भेंडी काढण्याण्यासाठी कात्री विकसित झाली आहे. कात्रीचा उपयोग केल्यास हातांना त्रास होत नाही.
३) एका मजुराद्वारे दिवसाला ५० ते ६० किलो भेंडी सहजपणे काढता येते. भेंडी काढण्याचा खर्च कमी होतो.

भुईमूग शेंगा तोडणी चौकट ः
१) यामध्ये २x१x१ आकाराची चौकट असून, त्यावर उलट्या व्ही आकाराचे दाते लावले आहेत.
२) शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूर शक्ती व वेळ यांची बचत होते. एकाच वेळी या शेंगा तोडणी चौकटीवर चार स्री मजूरकाम करू शकतात.
३) शेंगा तोडणीची क्रिया शेंगासाहित असलेल्या वेलाला तोडणी चौकटीवर ओढताना मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
४) हाताने शेंगा तोडण्यापेक्षा जवळ जवळ चारपट शेंगा तोडणी जास्त होते.साधारणपणे हाताने शेंगा तोडताना एक स्त्री मजूर ३० ते ३५ किलो शेंगा एका तासात तोडते.तीच स्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साहाय्याने १२० ते १३० किलो शेंगा एका तासात तोडते.
५) हे अवजार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र :
१) एका तासात एक मजूर सरासरी ५० ते ६० किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.
२) शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ,श्रम ,पैसा वाचतो.
३) यंत्राने शेंगा फोडल्यास ६ ते ८ टक्के फूट होते. मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.
४) यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.

मका सोळणी यंत्र :
१) यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून खेड्यातील कारागीर हे यंत्र तयार करू शकतो.
२) आकाराने लहान व वजनाने हलके, त्यामुळे हातात सहजपणे आणि जास्त श्रम न पडता धरता येते.
३) आठ तासांत साधारणपणे दोनशे किलो वाळलेली कणसे सोलून होतात.
४) लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणि वेळेची बचत करणारे हे यंत्र आहे.

दातेरी हात कोळपे :
१) पिकाच्या दोन ओळींत निंदणी करण्यासाठी उपयुक्त.
२) मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हातांनी मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो व मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते.
३) कोळप्याचे पाते १५ सें.मी.लांबीचे असते. त्यामुळे दोन ओळींत १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये या कोळप्याने निंदणी, खुरपणी करता येते.
४) कोळप्यामुळे साधारणपणे ३ सें.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते. सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपेसारख्या क्षमतेने वापरता येते.
५) हातकोळप्याचे वजन ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते. एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी-खुरपणी करू शकतो.

सायकल कोळपे :
१) या यंत्राचा उपयोग १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी, खुरपणी करण्याकरता होतो.
२) ५ ते ७ सें.मी.पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते.
३) एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी सहजपणे करू शकतो.

नवीन टोकण यंत्र :
१) हे एक मनुष्यचलित यंत्र असून मध्यम आकाराच्या बियाणे पेरणीसाठी वापरले जाते.
२) कमी क्षेत्र व डोंगराळ भागात सोयाबीन, ज्वारी, मका, इ. पिकाच्या पेरणीसाठी वापरता जाते.

चक्रीय टोकण यंत्र :
१) हे एक मनुष्यचलित यंत्र असून सायकल कोळप्याप्रमाणे पुढे ढकलून चालवले जाते.
२) यंत्राद्वारे मोठ्या व मध्यम आकाराच्या बियाण्याची उदा. सोयाबीन, ज्वारी, मका, मूग इ. पेरणी केली जाते.

बियाणे टोकण्यासाठी बी टोकण यंत्र ः
१) कापूस, तूर, मका इ पिकांची पेरणी मजुरांच्या साह्याने टोकण पद्धतीने करताना वाकून, एका हातात बियाणे व एका हाताने बोटाच्या किंवा काडीच्या साह्याने जमिनीत बी टोकले जाते. प्रत्येक वेळेस बी टोकताना वाकावे लागते. सदर पिकाची पेरणी करताना २-३ तास सहज काम करणे अशक्य प्राय गोष्ट आहे. यामध्ये श्रम जास्त लागते, तसेच प्रत्येक वेळेस वाकावे लागत असल्यामुळे कमरेत ताण येतो यामुळे आवश्यक कार्यक्षमता मिळत नाही; परिणामी कामाचा वेग कमी असतो.
२) बियाणे टोकण यंत्र वापरले असता टोकण करताना वाकावे लागत नाही. चालता चालता उभे राहून सहजरीत्या टोकण करता येते. यामुळे लागणारे श्रम व थकवा कमी होऊन मजुरांची कार्यक्षमता वाढते.
३) यंत्र वापरण्यास सहज सोपे व आरामदायक आहे
४) बियाणे एकसमान खोलीवर टोकता येते. कोरड्या किंवा वाफसा असलेल्या जमिनीत टोकण करता येते.
५) यंत्राबरोबर बियाणे ठेवण्यासाठी दिलेल्या पिशवीत बियाणे ठेवता येते. पिशवी कमरेला बांधता येते.
६) यंत्राच्या पाइपची लांबी १०० सें.मी. व व्यास १ सें.मी. इतका आहे.
७) यंत्राच्या वरच्या बाजूस बियाणे टाकण्यासाठी नरसाळ्याचा आकार बसवलेला आहे, जेणेकरून बियाणे त्यात टाकणे सोपे होते.
८) टोकण यंत्राला दिलेल्या लिव्हरच्या साह्याने यंत्राच्या खालचे तोंड चालू व बंद करता करता येते, त्यामुळे टाकलेले बियाणे जमिनीत टोकले जाते.

संपर्क ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

News Item ID: 
18-news_story-1538914221
Mobile Device Headline: 
सुधारित अवजारे करतात कष्ट कमी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, technowon, improved implements for farming
Author Type: 
External Author
वैभव सूर्यवंशी
Search Functional Tags: 
गहू, wheat, भेंडी, Okra, भुईमूग, Groundnut, मूग, परभणी, Parbhabi, कृषी विद्यापीठ, Agriculture University, यंत्र, Machine, सायकल, सोयाबीन, कापूस, तूर, विषय, Topics
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment