अकोला ः सोयाबीन हंगाम या भागात जोमाने सुरू झाल्यामुळे बाजारपेठेतील अावकही मोठ्या प्रमाणात वाढली अाहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ९) सोयाबीनची सुमारे साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिक अावक झाली होती.
सोयाबीन हे या भागातील प्रमुख पीक असून काढणी जोमाने सुरू झाली अाहे. यामुळे शेतकरी तयार झालेला माल विक्रीला अाणण्याचे प्रमाण अधिक अाहे. सोयाबीनला २७०० ते ३००० दरम्यान दर मिळत अाहे. सरासरी २८५० रुपये दराने सोयाबीन विक्री झाले.
बाजारात मुगाची अावकही स्थिर अाहे. मूग ४५०० ते ५४५० दरम्यान विक्री झाला. सरासरी पाच हजार रुपये दर मिळाला. ६३१ क्विंटल मूग विक्रीसाठी अाला होता. उडदाची विक्री ३६०० ते ४२५० रुपये क्विंटल दराने झाली. ३९०० रुपये सरासरी भाव मिळाला. ४९२ क्विंटल उडदाची विक्री झाली. या बाजार समितीत तुरीची ३४०० ते ३८०० दरम्यान विक्री सुरू अाहे. मंगळवारी सरासरी ३७०० रुपये दर भेटला. ५५५ क्विंटल तूर विक्रीसाठी अाली होती. गेल्या काही दिवसांत हरभऱ्याची अावकही टिकून अाहे. ८१२ क्विंटल हरभरा विक्री झाली. कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ४१५० रुपये हरभऱ्याचा दर होता. सरासरी ३८५० रुपये दर मिळाला.
ज्वारीचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले अाहेत. अद्याप ज्वारीचा हंगाम सुरू व्हायचा असल्याने चढउतार झालेला नाही. कमीत कमी ११५० व जास्तीत जास्त १३०० रुपये दराने ज्वारी विक्री होत अाहे. २८ क्विंटल ज्वारीची विक्री झाली. येथील बाजारात पांढरा हरभरा ३८०० ते ४२०० रुपये दराने विक्री झाला. ६९ क्विंटल हरभरा विक्रीसाठी अाला होता.

0 comments:
Post a Comment