कोल्हापूर - शेतीतील बेभरवशाची जोखीम नको म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात; पण पुनाळ (ता. पन्हाळा) येथील दोघा बहीण-भावाने मात्र वेगळी वाट धरत २० हजार झाडांची गुलाब शेती फुलवली आहे. शिक्षण घेतच सौरभ शिंदे व शिवानी शिंदे या भावंडांनी गुलाब शेती करीत श्रमाचे मोल ज्ञानार्जनासाठी वापरून प्रेरणादायी आदर्श फुलविला आहे.
सौरभ हा बीएस्सी ॲग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो, तर शिवानीचे पदवी शिक्षण झाले आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. २०१५ मध्ये गुलाब शेती सुरू करण्यासाठी पुण्याहून त्यांनी एकूण २० हजार गुलाबांची कलमे आणली. गेल्या तीन वर्षांपासून अखंड मेहनत करत त्यांनी ही गुलाब फुलांची बाग फुलवली आहे. एकूण ३६ गुंठे जमिनीवर पॉली हाऊसमध्ये ते गुलाबाचे उत्पादन करत आहेत. या झाडांमधून त्यांना दररोज एक हजार फुलांचे उत्पादन मिळते. कोल्हापूरसह मुंबई व पुण्यातील बाजारातही त्यांच्या मालाला वाढती मागणी आहे.
गुलाबाची शेती करताना दिवसभराचे नियोजन सांगताना शिवानी म्हणते, ‘‘पहाटे ठिबक सिंचनाने झाडांना पाणी दिले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार कीटकनाशके फवारणे, खते पुरवणे, बागेची स्वच्छता राखणे, तुरा व खुडा काढणे, गुलाबांची छाटणी करणे व त्यांचे व्यवस्थित पॅकिंग करणे ही सर्व कामे आम्ही दोघे मिळून करतो. शिवाय फुलांचे मार्केटिंगही स्वतःच करतो. त्यासाठी वडील धनाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभते.’’
इथे दिसते कष्टाचे फलित
घरापासून जवळच्या अंतरावर सौरभ व शिवानी ही भावंडे गुलाब शेती करतात. वास्तविक गुलाब शेती आज लावली आणि महिन्यात पीक घेतले असे होत नाही. त्यासाठी रोज खत, पाणी तसेच शेतीची मशागत सतत करावी लागते. त्यानंतर दीड ते तीन महिन्यांनी फुलोरा येतो. शेतीवर नजर टाकली तर बारीक आकाराच्या कळ्यांपासून झुप्पेदार टपोऱ्या पाकळ्यांची फुलदाणी फुलावी तशी फुललेली शेती, लाल टपोरी फुले, त्या फुलातील ताजेपणा शिवानी व सौरभ यांनी केलेल्या अथक कष्टाची साक्ष देतात.
अलीकडे गुलाबाचा उपयोग गुलाबपाणी, अत्तर तयार करण्यासोबतच सजावट, गुच्छे, हारतुरे करण्यासाठी वाढला आहे. येणाऱ्या काळात त्याचे प्रमाण वाढतच राहील. हेच डोळ्यांसमोर ठेवून आम्ही गुलाब शेती केली. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आम्हाला शिक्षण घेता येत आहे. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे गुलाब शेती विविधांगाने कशी फलदायी आहे हेही समजून घेता आले.
- सौरभ शिंदे

Plz send Groundnut breaking machine video
ReplyDelete