झरे - विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे टॅंकरने पाणी घालून शेतकरी द्राक्षबाग फुलवत आहेत. पाऊस नाही विहिरी, तलाव आटले आहेत. खरीप वाया गेला, रब्बीची पेरणी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत बागा जगवायच्या कश्या असा मोठा प्रश्न पडला आहे.
— sakal kolhapur (@kolhapursakal) October 19, 2018
यावर्षी बागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे पुढील वर्षी पाऊस पडला तर बागा तग धरू शकतात. काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी बागा सोडून दिल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे, ते शेतकरी टँकरने पाणी घालून कश्या बश्या बागा जागवितात.

विभूतवाडीचे शेतकरी आबा नाना खरजे यांची चार एकर द्राक्ष बाग असून त्यातील तीन एकर बाग धरली असून सध्या फळावर आहे. सर्वसाधारण साडेपाच महिन्यात बाग निघते. सध्या त्याच्या बागेला अडीच महिने झाले आहेत. बाग धरल्यापासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. बागेपासून पाण्याचे ठिकाण सात कि. मी. अंतर आहे येणे - जाणे 14 किलोमोटर अंतर भरते. १२,००० लिटर पाण्याचा एक टॅंकर १,५०० रुपये प्रमाणे दिवसाला पाच टॅंकर,महिन्याचे ७५ टॅंकर म्हणजे १,१२,५०० रुपये महिन्याला खर्च करून बाग जतन करीत आहेत.

या परिसरात सर्वच शेतकऱ्यांच्या बागेला टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी, किडनाशके. मजूरी यासाठी पैसे खर्च होतात मग शेतकऱ्यांच्या हातात राहणार काय?, मग बँकेचा हप्ता भरणार कसा ? घरखर्च चालणार कसा ? मुलांच्या शिक्षणाला पैसे आणायचे कुठून ? या विवंचनेत शेतकरी पार कोलमडून गेला आहे.
बागेसाठी असा होतो पाण्यावर खर्च -
१२.००० लिटर पाण्याचा एक टॅँकर १५०० रुपये , दिवसाला ५ टॅँकर, ५ X १५०० = ७५०० रुपये , महिन्याला ७५ टॅँकर, एकूण महिना खर्च ७५ X१५०० =१,१२,५००. सहा महिन्याचा पाण्याचा एकूण खर्च ७५ X ६ = ४५० टॅँकर, एकूण रुपये ४५०X १५०० = ६,७५,००० (सहा लाख पंच्याहत्तर रुपये )
पाणी, किडनाशके, मजूरी या खर्चाची बेरीज केली असता शिल्लक काहीच राहत नाही. आमच्या भागाला कायमस्वरूपी पाणी योजना झाल्यास पाण्याचा खर्च वाचेल आणि ते पैसे शिल्लक राहतील.
– आबा खरजे, शेतकरी
बागेला टॅंकरने पाणी देण्याची माझी ऐपत नसल्याने मी बाग धरली नाही त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे, बँकेचा हप्ताही भरू शकत नाही
- मनोहर थोरात, शेतकरी
झरे व घरनिकी परिसरातील सरासरी द्राक्षबागा क्षेत्र -
गाव हेक्टर
विभूतवाडी २३.३५
गुळेवाडी ५.२०
पारेकरवाडी १०.५७
झरे ४.००
कुरुंदवाडी ३.८०
घरनिकी ००.४७
पिंपरी/पडळकरवाडी २.२४

0 comments:
Post a Comment