Saturday, November 10, 2018

सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. १०) मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली. त्यांचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात शनिवारी भाज्यांची आवक तशी जेमतेम राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार काहीसा थंड होता. पण शनिवारी आवक आणि दरही वाढण्याची शक्‍यता होती. पण आवकही कमीच आणि दरही जैसे थे राहिले. पालेभाज्यांची आवक प्रत्येकी ५ ते ९ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ५५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

बाजारात हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या दराची परिस्थितीही फारशी तेजीची नव्हती. त्यांचे दरही स्थिरच राहिले. हिरव्या मिरचीची आवक १०, वांग्याची २० आणि टोमॅटोची ५०  क्विंटल राहिली. गवार, भेंडी, दोडका यांच्या दरातील तेजी मात्र शनिवारीही कायम राहिली. त्यांची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटल अशी होती. गवारला २०० ते ४०० रुपये, भेंडीला १५० ते ३०० रुपये आणि दोडक्‍याला १८० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कांद्याची आवकही १०-१२ गाड्यापर्यंत जेमतेम राहिली. कांद्याला ३०० ते १६०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

News Item ID: 
18-news_story-1541862331
Mobile Device Headline: 
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (ता. १०) मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी वाढली. त्यांचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात शनिवारी भाज्यांची आवक तशी जेमतेम राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार काहीसा थंड होता. पण शनिवारी आवक आणि दरही वाढण्याची शक्‍यता होती. पण आवकही कमीच आणि दरही जैसे थे राहिले. पालेभाज्यांची आवक प्रत्येकी ५ ते ९ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ५५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

बाजारात हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या दराची परिस्थितीही फारशी तेजीची नव्हती. त्यांचे दरही स्थिरच राहिले. हिरव्या मिरचीची आवक १०, वांग्याची २० आणि टोमॅटोची ५०  क्विंटल राहिली. गवार, भेंडी, दोडका यांच्या दरातील तेजी मात्र शनिवारीही कायम राहिली. त्यांची आवक प्रत्येकी १० ते २० क्विंटल अशी होती. गवारला २०० ते ४०० रुपये, भेंडीला १५० ते ३०० रुपये आणि दोडक्‍याला १८० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कांद्याची आवकही १०-१२ गाड्यापर्यंत जेमतेम राहिली. कांद्याला ३०० ते १६०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

English Headline: 
agriculture news in marathi, commodity rates in market committee, solapur, maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment