केळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा निर्मितीच्याबरोबरीने सेंद्रिय खत, गांडूळ खतनिर्मितीसाठी करता येतो. गुजरात राज्यातील नवसारी कृषी विद्यापीठाने केळीच्या झाडाच्या खोडापासून विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे.
एका केळीच्या खोडापासून २०० ग्रॅम धागा, ४ ते ५ लिटर सेंद्रिय द्रव्य, गांडूळ खतनिर्मितीसाठी घटक मिळतात. नवसारी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी खोडातील सर्वात आतील भागापासून कॅंडी, लोणचे निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे.
खोडाचे उपयोग ः
१) धागा २) सेंद्रिय द्रव्य ३) गांडूळ खत,४) खाण्यायोग्य पदार्थ उदा. कॅंडी, लोणचे इ., ५) पेपरनिर्मिती ६) पर्स, पिशवीनिर्मिती, ७) पार्टीकल बोर्ड (प्लाय)
सेंद्रिय द्रव्यनिर्मिती:
१) कटरच्या साह्याने केळी खोडावरील वेगळे केलेले आवरण रास्पडोर यंत्रामध्ये घातले असता हॅमरिंगमुळे त्यातील पाणी, सेल्युलोज धाग्यापासून वेगळे करून साठवतात. वेगळा केलेला खोडाच्या भागावर प्रेसिंग यंत्राच्या साह्याने दाब देऊन त्यातील पाणी वेगळे केले जाते.
२) खोडापासून मिळालेल्या पाण्यावर डायजेस्टरमध्ये एकवीस दिवस प्रक्रिया केली जाते. त्यानंतर या द्रावणाचा वापर पिकावर फवारणी किंवा ठिबकद्वारे पिकांना देता येते.
केळी धागानिर्मिती:
पाणी आणि सेल्युलोज वेगळे झाल्यावर केळी खोडावरील आवरण यंत्रामधून मागे ओढले असता धागा मिळतो. हे धागे स्वच्छ पाण्यात धुवून वाळवले जातात. चरखा किंवा यार्न यंत्राच्या साह्याने वाळलेल्या धाग्यापासून रील बनविले जातात. केळी धाग्यापासून पर्स, पिशवी, चटई तयार केली जाते. याचबरोबरीने कापूस आणि केळी धाग्याचा वापर करून कपडेनिर्मिती केली जाते.
गांडूळ खत ः
प्रेसिंग यंत्राच्या साह्याने पाणी वेगळे केल्यावर उरलेल्या घटकांचा वापर गांडूळनिर्मितीमध्ये करता येतो. खोडाचा वाया जाणारा भाग हा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो. गांडूळ खत तयार करताना शेण आणि धागानिर्मितीनंतर उरलेल्या घटकांचे एकावर एक थर दिले जातात. तयार केलेल्या वाफ्यावर गांडूळ सोडली जातात. काही दिवसांमध्ये वाया जाणाऱ्या घटकांपासून गांडूळ खत तयार होते.
उपयुक्त यंत्रे ः
केळी खोडाचे तुकडे करणारे कटर
१) खोडातून धागा, पाणी वेगळे करण्यासाठी खोडावरील एकेक आवरण वेगळे करावे लागते. त्यासाठी मजूर श्रम व वेळ जास्त लागतो. खोडाचे दोन उभे समान भाग केले असता आवरण सहजरित्या निघते. मजुरांची कार्यक्षमता वाढते.
२) खोडाचे दोन समान भाग करण्यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाने यंत्र तयार केले आहे. या यंत्रामध्ये एका तासात सुमारे १५० खोडांचे उभे दोन समान भाग केले जातात, यासाठी दोन मजूर लागतात.
३) या यंत्रासाठी दोन अश्वशक्तीची विद्युत मोटर आणि १८ इंच व्यास असलेला कटर वापरला जातो.
रास्पडोर यंत्र ः
१) यंत्राद्वारे वेगळे केलेल्या खोडाच्या आवरणातून धागा काढला जातो.
२) यंत्रामध्ये मळणीसाठी वापरले जाणारे रास्प बार सिलेंडर असतात. खोडाचे आवरण त्यामध्ये घातले असता हॅमरिंग ॲक्शनच्या सहाय्याने खोडातील पाणी व धाग्या व्यतिरिक्त असलेला भाग काढून केळी धागा मागे ओढून काढला जातो.
संपर्क ः वैभव सूर्यवंशी ९७३०६९६५५४
(विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र , ममुराबाद फार्म, जि. जळगाव)

0 comments:
Post a Comment