सातारा ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावाच्या दरम्यान म्हणजेच ३३५० ते ३४५० रुपये क्विंटलदरम्यान दर दिला जात आहे. मात्र दर कमी असतानाही दसरा, दिवाळीसाठी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री केल्याने वाढीव दरापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.
जिल्ह्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून खरिपात सोयाबीन प्रमुख पीक झाले आहे. प्रत्येक वर्षी क्षेत्रात वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट होत आहे. मात्र गेल्या वर्षीपासून सोयाबीन पिकास मिळणारा दर, व्यापाऱ्यांकडून होत असलेली लुट तसेच प्रशासनाकडून होत नसलेली कारवाई यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात घट होऊ लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात जवळपास १२ हजार हेक्टरने सोयाबीनच्या क्षेत्रात घट होऊन हे क्षेत्र ६० हजार हेक्टरवर आले आहे. हेक्टरी किमान सरासरी १५ क्विंटल सोयाबीन उत्पादन धरले तर जिल्ह्यात नऊ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणीची कामे जवळपास उरकली होती. या काळात शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही नाफेडने त्याकडे दुर्लक्ष करत व्यापारी धार्जिणी भूमिका घेत खरेदी केंद्र सुरू केली नाहीत. दसरा आणि दिवाळी सण असल्याने शेतकऱ्यांना पैश्याची गरज होती. त्यामुळे सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय नव्हता. जिल्ह्यातील ७० टक्क्यांवर सोयाबीनची खरेदी झाल्यावर एक नोंव्हेबरला सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली गेली. ही केंद्रे सुरू झाल्यापासून व्यापाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा करण्यास सुरवात केली. सध्या व्यापाऱ्यांकडून क्विंटलला ३३५० ते ३४५० रुपये दर दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.
...तर नुकसान टळले असते
सातारा, कोरेगाव व वाई तीन केंद्रांवर ७३.७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीन पिकासाठी केंद्र शासनाने ३३९९ रुपये क्विंटल हमीभाव जाहिर केला. मात्र हा हमीभाव कागदावरच राहिला आहे. सोयाबीन काढणीच्यावेळी नाफेडने खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर केला. परिणामी सणावारांच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनची २५०० ते ३००० रुपये क्विंटल दराने खरेदी केली. खरेदी केंद्रे सोयाबीन काढणीच्या वेळी सुरू झाली असती तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळता आले असते.

खपली गहू किती दिवसांचा पीक आहे.
ReplyDelete